जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा

गडचिरोली,(जिमाका)दि.09: संयुक्त राष्ट्राने 1972 पासून 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याचे जाहीर केले. तेव्हापासून दरवर्षी 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून पाळला जातो. जागतिक पर्यावरण दिन (World Environment Day) हा दिवस म्हणजे सत्तरच्या दशकात सुरु झालेली संयुक्त राष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी जागरुकता मोहिम,वसुंधरेची चिंता असलेले,त्याची काळजी घेणारे अनेक पर्यावरणवादी घटक,संघटना,पर्यावरण प्रेमींकडून हा दिवस साजरा केला जातो. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी या दिवशी वेगवेगळया कार्यक्रमाचं आयोजन केलं जात.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांचे समान-किमान कार्यक्रमानुसार व अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश,गडचिरोली यु.बी.शुक्ल यांचे निर्देशानुसार तसेच सचिव,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधिश,(व.स्तर) गडचिरोली,आर.आर.पाटील यांचे मार्गदर्शनात दिनांक 8 जून ,2022 रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ,गडचिरोली कार्यालयाचे परिसरात वृक्षरोपनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.सदर कार्याक्रमास अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश,गडचिरोली यु.बी.शुक्ल, अध्यक्ष,जिल्हा अधिवक्ता संघ गडचिरोली,रविंद्र दोनाडकर, जिल्हा न्यायाधिश-1 तथा अतिरीक्त सत्र न्यायाधिश,गडचिरोली,यु.एम.मुधोळकर, जिल्हा न्यायाधिश-1 तथा अतिरीक्त सत्र न्यायाधिश,गडचिरोली,ए.एस.पंढरीकर,तदर्थ जिल्हा न्यायाधिश-1 तथा अतिरीक्त सत्र न्यायाधिश,गडचिरोली,एम.आर.वाशिमकर, मुख्यन्यायंदडाधिकारी,गडचिरोली, आर.आर.खामतकर,व्दितीय सहदिवाणी न्यायाधिश (क.स्तर) तथा न्यायदंडाधिकारी,प्रथम श्रेणी,गडचिरोली,एन.सी.सोरते,सह दिवाणी न्यायाधिश (क.स्तर) तथा न्यायदंडाधिकारी,प्रथम श्रेणी,गडचिरोली,तसेच प्रबंधक जिल्हा न्यायालय,ए.एस.घरोटे,आणि न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश,गडचिरोली यु.बी.शुक्ल यांनी जागतिक पर्यावरण दिनाबाबत मार्गदर्शन करतांना पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्राधान्याने पावले उचलण्याची गरज आहे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,गडचिरोली येथील कर्मचारी अधिक्षक,जी.एम.सुखदेवे, एस.टी.सहारे, अक्षय ठाकरे,शंकर आळे,सुनिल चुधरी,संतोष वासेकर,नितीन जाधव,यांनी अथक परिश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

शेतीला पाणी घेण्याकरिता लावलेली कन्हान नदी काठावरून चोरी

Fri Jun 10 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत दक्षिणेस सात कि मी अंतरावर मौजा सिहोरा शेत शिवारात कन्हान नदी काठावर लावलेली काॅमटन ग्रीव्ही कंपनीची ३ एच पी पावर ची मोटार कोणीतरी अज्ञात चोरट्यांने चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादीच्या तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध घेत आहे. प्राप्त माहिती नुसार कलवींदरसिंग सुरजितसिंग […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com