जिल्हा वार्षिक योजना : नागपूर विभागाची राज्यस्तरीय बैठक 27 जानेवारीला

नागपूर : जिल्हा वार्षिक योजनेचे प्रारूप आराखडे अंतिम करण्यासाठी नागपूर विभागाची राज्यस्तरीय बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 27 जानेवारी 2023 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीच्या जिल्हानिहाय वेळापत्रकानुसार चंद्रपूर जिल्ह्याची बैठक दुपारी 4 ते 4.30 पर्यत, गोंदिया 4.30 ते 5, गडचिरोली सायंकाळी 5 ते 5.30, वर्धा 5.30 ते 6, भंडारा 6 ते 6.30 आणि नागपूर जिल्ह्याची बैठक सायंकाळी 6.30 ते 7 या वेळेत होणार आहे.

नागपूर विभागात सुरू असलेल्या शिक्षक विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाने जिल्हा वार्षिक योजनेच्या राज्यस्तरीय बैठकीसाठी सशर्त परवानगी दिली आहे. त्याअनुषंगाने सदर बैठकांमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयांबाबत कोणत्याही प्रकारची घोषणा तसेच माध्यमांमध्ये प्रसिद्धी करता येणार नसल्याचे विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रैनपुर में धरना-प्रदर्शन, किसान सभा ने कहा : वनाधिकार देने और भूविस्थापितों की समस्या हल करने में कांग्रेस सरकार नाकाम

Wed Jan 18 , 2023
कोरबा :- अखिल भारतीय किसान सभा से संबद्ध छत्तीसगढ़ किसान सभा ने मुख्यमंत्री भूपेश बघेल के कटघोरा विधानसभा आगमन पर भूविस्थापितों को नियमित रोजगार देने और वनभूमि पर काबिजों को वनाधिकार पट्टा देने की मांग पर ग्राम रैनपुर में 2 घंटे तक जबरदस्त नारेबाज़ी के साथ धरना-प्रदर्शन किया और दीपका थाना प्रभारी को मुख्यमंत्री के नाम ज्ञापन सौंपा। कटघोरा एसडीएम […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com