सावनेर : लॉयन्स क्लबच्या वतीने सावनेर येथील स्वामी विवेकानंद वृद्धाश्रमात 32 वृद्धांना चष्मे वाटप करण्यात आले. या आधी विश्व आरोग्य दिवशी क्लबच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी नेत्र तपासणी शिबिरात वृद्धाश्रमातील सर्व ज्येष्ठांची आरोग्य आणि डोळ्यांची तपासणी केली होती. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर जिल्हा लायन्स क्लब प्रांतपाल राजेंद्र सिंग बगा, प्रमुख अतिथी प्रदेश अध्यक्ष अवनीकांत वर्मा, जिल्हा कॅबिनेट सचिव संदीप जैस्वाल , नीलम बगा, अनिता वर्मा, लॉन्स क्लब नागपूर विजन चे अध्यक्ष धनंजय ठोंबरे व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी लॉयन्स क्लबचे उपाध्यक्ष डॉ. शिवम पुण्यानी व कोषाध्यक्ष ऍड . मनोजकुमार खंगारे यांनी क्लबतर्फे राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. राजेंद्र सिंग बगा यांनी समाज कार्यासाठी लॉयन्स क्लब चे दरवाजे सदैव सुरू राहतील अशी ग्वाही दिली.प्रदेश अध्यक्ष अवनीकांत वर्मा यांनी रुकेश मुसळे, डॉ. प्रवीण चव्हाण, डॉ. छत्रपती मानापुरे, प्रविण सावल व प्रवीण टोणपे यांनी केलेल्या कार्याची विशेष दखल घेत त्यांना गौरविण्यात आले.
प्रसंगी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आश्रमात पाहुण्या मार्फत वृक्ष लागवड सुद्धा करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्लबचे अध्यक्ष ऍड. अभिषेक मुलमुले यांनी केले व पुढील वर्षभरातच 50 हून अधिक वृक्ष क्लब मार्फत लावण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच द्वितीय उपाध्यक्ष किशोर सावल यांनी कार्यक्रमाचे संचालन केले तर चार्टर्ड अध्यक्ष वत्सल्य बांगरे यांनी आभार मानले. प्रा. विलास डोईफोडे, पीयूष झिंजुवाडिया, मिथिलेश बालाखे, ऍड . प्रियंका मुलमुले आणि क्लबच्या अन्य सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.