नागपूर :- कौटुंबिक शिधापत्रक धारकांनी ऑक्टोबर महिन्यातील मोफत अन्नधान्याचा लाभ घेण्याचे आवाहन नागपूर,अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
‘राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम-२०१३’ ची राज्यात अंमलबजावणी सुरु असून दर महिन्याच्या १ तारखेला शिधापत्रिका धारकांना अन्नधान्य वितरीत करण्यात येते तसेच या अधिनियमा अंतर्गत अनुज्ञेय असलेले अन्नधन्य १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीसाठी वितरीत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार प्राधान्य गट व अंत्योदय योजना शिधापत्रधारकांना गहू व तांदूळ ही धान्ये मोफत वितरित करण्यात येणार आहे.