वीज कर्मचा-यांकडून धम्म बांधवांना भोजन व पुस्तिका वितरण

नागपूर :- 67 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर येथील पवित्र दिक्षाभुमीला भेट देणा-या धम्म बांधवांकरिता भोजनदान, राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याची माहिती देणारे पुस्तक व महावितरणच्या विविध योजना व सुविधांच्या माहिती पत्रकाचे निशुल्क वाटप महाराष्ट्र राज्य वीज वितरण, पारेषण व निर्मिती कंपनी मर्यादीत भोजनदान समितीतर्फ़े करण्यात आले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथील दीक्षाभूमीवर आपल्या असंख्य अनुयायांना बौधा धर्माची दिक्षा दिली होती, या ऐतिहासिक दिनाच्या अनुषंगाने दरवर्षी विजयादशमीच्या दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षीच्या 67 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पवित्र दिक्षाभुमीवर आलेल्या संपूर्ण महाराष्ट्रातील धम्म अनुयायांना आपल्या गावी परत जाताना भोजनदान व राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याची माहिती देणारे पुस्तक तसेच महावितरणच्या योजना व सुविधा पत्रकाचे निशुल्क वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन महावितरण नागपूरचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांचे हस्ते आणि नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता अजय खोब्रागडे, राजेश नाईक, आणि कार्यकारी अभियंता हेमराज ढोके, यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. आपल्या उद्घाटनपर भाषणात प्रादेशिक संचालक रंगारी सुहास रंगारी यांनी बाबासाहेबांच्या तेंव्हांच्या धम्मदीक्षा कार्यक्रमाबाबत माहिती देऊन सर्वांनी समानता व सदाचरण याबाबत जागरूकता बाळगावी व जनतेने याठिकाणी होणाऱ्या भोजनदानासोबतच मोफत पुस्तक वितरणाच्या माध्यमातून आपली ज्ञानाची भुक भागवावी आणि समाजाला आणखी शिक्षीत बनवून बाबासाहेबांच्या कार्याला पुढे नेण्याचे आवाहन केले तर मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी महावितरण कडुन सामान्य जनतेसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत त्यामध्ये ऑनलाईन वीजबिल भरणा व गो ग्रीन मधुन बील भरल्यास दहा रुपयांची सुट, सोलर योजने अंतर्गत वीजनिर्मिती व वापराची मुभा तसेच शेतकऱ्यांना मदत याबाबत मार्गदर्शन केले तसेच पुढील वर्षी महावितरण लोकाभिमुख प्रसाराचे दृष्टीने दिक्षाभुमीवर भोजनदानासोबतच दोन दिवस माहितीकक्ष सुरु करण्यासाठी भोजनदान व पुस्तक वितरण समितीने पुढाकार घ्यावा असे सुचवले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धोंगडे यांनी, प्रस्ताविक मधुकर सुरवाडे यांनी तर आभार प्रदर्शन भैय्याजी रेवतकर यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समिती सदस्य सहाय्यक अभियंता कुणाल पाटील,राजेंद्र पाटील, प्रफुल मेश्राम, भीमराव सोमकुवर, रणजीत पानतावणे, बादल गोस्वामी, अमोल मेंढे, दिलीप आवळे, मनोज मेश्राम, अनिल टेंभुर्णे, नरेंद्र तिजारे, प्रशांत नानोरे, संतोष हिरुळकर, सचिन राऊत, महेंद्र पाचघरे, पुरुषोत्तम मानकर, राजेंद्र चरपे, सुमित रेवतकर, प्रमोद मेश्राम, राजेंद्र पाटील, अविनाश अंबादे, एच.ए.पाटील, विजय गायकवाड, राहुल लांजेवार, अमरदीप बागडे, अतुल कोटांगळे, सुरज गजभीये, प्रशांत मेश्राम, उदल राठोड, मनीष कुंभारे, आशिष जुवार, मनोज भेंडे, रवि दुरुगकर व नागपूर,भंडारा, देवरी व गोंदिया च्या कर्मचा-यांनी अथक परिश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘मेरी माटी मेरा देश’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील अमृत कलशासह स्वयंसेवक रवाना

Thu Oct 26 , 2023
– जिल्हाधिका-यांची उपस्थिती नागपूर :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानात नागपूर जिल्ह्यातील स्वयंसेवकांसोबत जिल्ह्यातील १५ अमृत कलश आज जिल्हाधिकारी कार्यालयातून रवाना करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर आणि जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांची उपस्थिती होती. जिल्ह्यातील १३ पंचायत समिती, १ महानगरपालिका व सर्व नगरपालिका मिळून १ असे १५ अमृत कलश आज सायंकाळी नेहरू युवा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com