– खासदार क्रीडा महोत्सव
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरामध्ये सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवात विविध स्पर्धांमध्ये दिव्यांग मुले व मुलींनी यश संपादित केले. ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानात शुक्रवारी (ता.19) मुलांच्या 3 किमी अंतराच्या मॅरेथॉनमध्ये शुभम सावंतने पहिला क्रमांक पटकाविला. तर स्वराजदीप धुर्वेने दुसरा, रितीक सोनवणेने तिसरा क्रमांक पटकाविला. निखिल काचोळे आणि रविदास दसरिया यांना प्रोत्साहन पुरस्कार प्रदान करण्यात आले.
मुलींच्या 2 किमी अंतराच्या मॅरेथॉनमध्ये अनोमा वैद्यने प्रथम क्रमांक प्राप्त केला तर रविना कौरतीने द्वितीय व श्रद्धा कडूने तृतीय क्रमांक प्राप्त केला. निधी तरारे व शितल भोयरला प्रोत्साहन पुरस्कार देण्यात आले.
खुल्या गटातील कॅरममध्ये मुलांमध्ये सोनेगाव येथील मुकेश बावणे आणि कमल बर्मण विजेते ठरले. तर मुलींच्या दुहेरी स्पर्धेत हुडकेश्वर येथील प्रिती भड आणि चेतना गोखे ने पहिला तर सावनेर येथील समिक्षा वजरखे आणि मनस्वी लाकडे ने दुसरा क्रमांक पटकाविला.
गोळाफेक स्पर्धेत मुलांमधून गणेश माटे पहिला आला तर सौरभ राठोड आणि साहित्य उकेने दुसरा व तिसरा क्रमांक पटकाविला. मुलींमध्ये अनोमा वैद्य पहिली, काजल माहुर्ले दुसरी आणि धनश्री डहारे तिसरी आली.
19 ते 24 वर्ष वयोगटातील 100 मीटर दौडमध्ये हर्षल ठाकरे, अमीर अंसारी आणि रितीक सोनवणे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला. तर मुलींमध्ये राणी धुर्वे, श्रद्धा कडू आणि सिद्धी बिसेन यांनी पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक प्राप्त केला.
क्रिकेट स्पर्धेत डेफ टायगर संघाने सोनगाव संघाचा पराभव करून विजय मिळविला. सोनेगाव संघाचा सनी सामनावीर ठरला. डेफ टायगरचा अरबाज उत्कृष्ट गोलंदाज, अमित उत्कृष्ट फलंदाज आणि सोनेगावचा रोहित नागमोते उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरला.