१९ फेब्रुवारीपासुन ” भव्य राज्यस्तरीय भिंतीचित्र महोत्सव – भाग २”  

वैयक्तीक व गट बनवुन घेता येणार सहभाग

हौशी व व्यावसायिक चित्रकारांना संधी

प्रथम बक्षीस रोख १ लक्ष ५१ हजार रुपये

चंद्रपूर :- डिसेंबर महिन्यात झालेल्या भिंतीचित्र महोत्सवाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे १९ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी दरम्यान राज्यस्तरीय भिंतीचित्र महोत्सव भाग २ आयोजीत करण्यात येत आहे. चंद्रपूर शहर सुशोभीकरण व सौंदर्यीकरण या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित भिंतीचित्र पेंटींग,वृक्ष पेंटींग, क्रीएटीव्ह पेंटींग या ३ स्पर्धा यात घेण्यात येणार आहे.

सदर स्पर्धा ही शहर स्वच्छता व सौंदर्यीकरण अभियान, स्वच्छ सर्वेक्षण २०२३ आणि माझी वसुंधरा अभियान अंतर्गत घेण्यात येत असुन विचारप्रवर्तक आणि नाविन्यपुर्ण अशी भिंतीचित्रे तयार करु शकणाऱ्या चित्रकार आणि कलाप्रेमींसाठी ही स्पर्धा आहे. महाराष्ट्र राज्याच्या कुठल्याही शहरातील रहिवासी नागरीक यात सहभागी होऊ शकतो. या स्पर्धेत शहरातील मुख्य दर्शनी भागातील भिंतींवर पर्यावरण संवर्धन,वैज्ञानिक व त्यांचे शोध,महाराष्ट्रातील संत व त्यांचे कार्य + अभंग,संस्कारक्षम ( संस्कार देणारी ) चित्रे,स्वातंत्र्य संग्रामातील शिलेदार, पर्यावरण संरक्षण, स्वच्छतापर संदेश, प्लास्टीक बंदी चंद्रपूरचे ऐतिहासिक वैभव, रेन वॉटर हार्वेस्टींग अशा विविध १८ विषयाचे चित्रण केले जाणार आहे. या महोत्सवात व्यावसायिक तसेच हौशी चित्रकारांना सुद्धा भाग घेता येणार असुन उत्कृष्ट चित्रनिर्मिती करणाऱ्या कलाकारांना रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.

भिंतीचित्र पेंटींग स्पर्धेत चित्रकारांसाठी वैयक्तीक गट व समुह गट ठेवण्यात आला आहे. समुह गटात प्रथम बक्षीस १ लक्ष ५१ हजार रुपये असुन द्वितीय १ लक्ष तर तृतीय बक्षीस ५१ हजार रुपये दिले जाणार आहे. तर वैयक्तीक गटातील स्पर्धकास एका ठिकाणी ( किमान १०० स्क्वे.फुट ) ची पेंटिंग करावी लागेल तसेच वैयक्तिक स्पर्धक एकापेक्षा जास्त ठिकाणी भित्तिचित्र काढू शकतात (जास्तीत जास्त 5 ठिकाणी ). या गटात प्रथम बक्षीस ७१ हजार रुपये असुन द्वितीय ५१ हजार तृतीय बक्षीस ३१ हजार रुपये तसेच प्रत्येकी १० प्रोत्साहनपर बक्षिसे सुद्धा दिली जाणार आहेत.

त्याचप्रमाणे वृक्ष पेंटींग स्पर्धेत नेमून दिलेल्या झाडांचे सौंदर्यीकरण करणे अपेक्षित आहे. यात अनुक्रमे २१ हजार,१५ हजार, ११ हजार रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. क्रीएटीव्ह पेंटींग स्पर्धेत सार्वजनिक ठिकाणी सभोवताली उपलब्ध असलेल्या वस्तु / झाडी इत्यादींचा वापर करून कलात्मक पेंटींग करणे अपेक्षित आहे.यात सुद्धा अनुक्रमे २१ हजार,१५ हजार, ११ हजार रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत.

स्पर्धेत भाग घेणारे स्पर्धक हे चित्रकलेत पारंगत असावे या दृष्टीने स्पर्धकांसाठी पात्रता निकष ठेवण्यात आले आहेत. जसे स्पर्धक चित्रकला शिक्षक/ ललित चित्रकला/ आर्ट डिप्लोमा /एटीडी धारक किंवा त्याच्याकडे भिंती चित्रकला / स्पर्धांमधे विजेते असल्याचे प्रमाणपत्र हवे त्याचे कला किंवा चित्रकला संबंधित दुकान हवे किंवा तसा पुरावा हवा अथवा तो रेखाचित्र मास्टर ( ATD ) असणे आवश्यक आहे.

भाग कसा घ्यावा – https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfFxMvEJWdS9PjlrBX3XNZ8eUyDIxWNwGuIYCKDtNBgSvYf8A/viewform या गुगल लिंकद्वारे स्पर्धेत भाग घेता येईल. अधिक माहितीसाठी ७०००८९९४९५,८३२९१६९७४३ या मोबाईल नंबरवर तसेच मनपा स्वच्छता विभागात संपर्क साधता येईल.

भाग घेण्यास पात्रता :

१. चित्रकला शिक्षक

२. ललित चित्रकला

३. आर्ट डिप्लोमा /एटीडी

४. भिंती चित्रकला / स्पर्धांमधे विजेते असल्याचे प्रमाणपत्र

५. कला किंवा चित्रकला दुकान किंवा तसा पुरावा हवा

६. रेखाचित्र मास्टर ( ATD )

स्पर्धेचे विषय :

१. पर्यावरण संवर्धन

२. वैज्ञानिक व त्यांचे शोध

३. महाराष्ट्रातील संत व त्यांचे कार्य + अभंग

४.संस्कारक्षम ( संस्कार देणारी ) चित्रे

५. स्वच्छ चंद्रपूर

६. स्वच्छ भारत

७. पर्यावरण संरक्षण

८. प्लास्टीक बंदी

९. स्वच्छ हवा

१०. स्वच्छ पाणी

११. रेन वॉटर हार्वेस्टींग

१२. माझी वसुंधरा

१३. सौर ऊर्जेचा वापर

१४. बॅटरी चलीत वाहनाचा वापर

१५. चंद्रपूरचे ऐतिहासिक वैभव

१६. मलेरीया व डेंग्यु प्रतिबंध

१७. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

१८. 3R – Reduse,reuse and recycle

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

India does not want to remain an assembly workshop; Manufacturing cutting-edge products need of the hour to attain ‘Aatmanirbharta’: Raksha Mantri during CEOs Round Table during Aero India 2023 in Bengaluru

Tue Feb 14 , 2023
Calls upon Indian & global industry leaders to support the Government’s endeavour “We’re committed to fully harness the energy, spirit & capability of private sector partners” Government-Industry partnership based on equality & mutual trust: Shri Rajnath Singh  New Delhi:- Raksha Mantri Rajnath Singh has called upon Indian & global industry leaders to support the Government’s endeavour to design, develop and […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com