संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
कन्हान : – शहर विकास मंच द्वारे ६६ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिवसा निमित्य आंबेडकर चौक कन्हान येथे प्रामुख्याने उपस्थित संस्थेचे मार्गदर्शक भरत सावळे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी संस्थेचे सहसचिव प्रकाश कुर्वे, कोषा ध्यक्ष प्रणय बावनकुळे यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिवसा निमित्य उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास उप स्थित सर्व मंच पदाधिका-यांनी व सदस्यांनी डॉ बाबा साहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करून विनम्र अभिवादन करीत धम्मचक्र प्रवर्तन दिवस थाटा त साजरा करण्यात आला. याप्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर, उपा ध्यक्ष महेंद्र साबरे, सचिव सुरज वरखडे, सहसचिव प्रकाश कुर्वे, कोषाध्यक्ष प्रणय बावनकुळे, अश्विन भिवगडे, हरीओम प्रकाश नारायण, अनुराग महल्ले, अंकुश शेंडे सह मंच पदाधिकारी व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.