अवैध दारूची तस्करी करणाऱ्या आरोपीतांविरूद्ध धडक मोहीम

देवलापार :- पोलीस ठाणे देवलापार येथील स्टाफ पोस्टे ह‌द्दीत प्रोव्हीशन रेडकामी पेट्रोलींग करीत असता गोपनीय माहिती मिळाली की, एक इसम पोस्टे देवलापार अंतर्गत मौजा बंजार पचरई येथे अवैधरीत्या मोहाफुल गावठी दारूची विक्री करीत आहे. अशा मिळालेल्या माहिती वरून मौजा बंजार पथरई येथे पोहचुन आरोपी देविदास सखाराम उईके वय ४० वर्ष रा वंजार पथरइ याचे ताब्यातून ०२ प्लास्टीक डबकीमध्ये ०५ लिटरच्या २ प्लास्टीक डबकि मध्ये एकुण १० लिटर मोहाफुल गावठी दारू प्रत्येकी ५० रू लिटर प्रमाणे एकुण ५०० रू चा माल मिळुन आल्याने जप्त करून आरोपीविरूद्ध कलम ६५ ई मुदाका प्रमाणे कारवाई करण्यात आली.

पोस्टे काटोल येथील स्टाफ यांना मुखबिरद्वारे माहिती मिळाली की, आंबेडकर चौक काटोल येथे आरोपी घनशाम पुंडलीकराव तांदळे, वय ४६ वर्ष रा. रेवतकर ले आउट ता. काटोल जि. नागपुर हा त्याचे जवळील कापडी थैलीमध्ये देशी दारूच्या निपा बाळगुन बसस्टैंड जवळील मॅजिक मोबाईल शॉपचे समोर उभा आहे. अशा मिळालेल्या माहिती वरून स्टाफ यांनी घटनास्थळी रेड कारवाई करून आरोपीचे ताब्यातून देशी दारू संत्रा नं १ डिलक्स कंपनीच्या ७० प्लॉस्टीकच्या निपा प्रत्येकी १८० एम.एल. एकुण च्या प्रती निषा किंमती ७०/- रू प्रमाणे असा एकूण ४९००/- रू या मुद्देमाल जप्त करून आरोपीविरूद्ध कलम ६५ ई मुदाका प्रमाणे कारवाई करण्यात आली.

पोस्टे केळवद अंतर्गत मौजा तिडंगी येथे पोलीस स्टाफ यांना पेट्रोलींग दरम्यान मिळालेल्या गोपनीय खबरेवरून रेड कारवाई केली असता आरोपी अनिल श्यामराव भुतमारे, वय ५० वर्ष रा. तिडंगी याची दारूवाबत मरझडती घेतली असता आरोपीच्या घराच्या बेडरूममध्ये एका प्लास्टीक पिशवीमध्ये देशी दारू संत्रा भिंगरी नं ०१ च्या १० निपा १८० एम.एल प्रत्येकी कि ७०/- रू एकूण किंमती ७०० चा माल एकुण १८०० एम. एल. चा मुद्देमाल विनापरवाना अवैधरीत्या मिळुन आल्याने आरोपीविरूद्ध पोस्टे केळवद येथे ६५(ई) मुदाका प्रमाणे कारवाई करण्यात आली.

तसेच केळवद पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहिती वरून आरोपी १) मनोज नारायण गुप्ता वय ५० वर्ष रा. बसस्टॉप जवळ सावनेर, जि नागपूर २) आकाश रमेश माटे वय २४ वर्ष रा वार्ड क्र. १६ मूरलीधर मंदीर ता. सावनेर जि. नागपुर यांचे गुप्ता नावाचे ढाब्याची झडती घेतली असता त्यांचे ढाब्याचे आतील काउंटरमध्ये एका प्लास्टिक चुमडीमध्ये १) देशी दारू भिगरी संत्रा नं ०१ च्या ०८ प्लास्टीकच्या सिलबंद निपा प्रत्येकी १८० एम.एल क्षमतेच्या एकूण १४४० एम एल प्रत्येकी किंमती ७० रू एकुन कि. ५६०/- रू.२) देशी दारू भिगरी संत्रा नं ०१ च्या ११८ प्लास्टीकच्या सिलबंद निपा प्रत्येकी ९० एम. एल क्षमतेच्या एकूण १०६२० एम एल प्रत्येकी कि -३५ रू एकुन किं ४१३०/- रू ३) रॉयल स्टाँग विदेशी दारू काचेच्या प्रत्येकी १८० एमएल च्या ०६ निपा एकूण १०८० एमएल प्रती १८०/- रू प्रमाणे एकूण किं १०८०/- रू. ४) इंम्पेरीयल ब्ल्यू विदेशी दारू काचेच्या प्रत्येकी १८० एमएल च्या ०४ निपा एकूण ७२० एमएल प्रती १६०/- रू प्रमाणे एकूण कि-६४०/- रू.५) इंम्पेरीयल ब्ल्यू विदेशी दारू काचेच्या प्रत्येकी ९० एमएल च्या १२ निषा एकूण १०८० एमएल प्रती ८५/- रू प्रमाणे एकूण कि- १०२० /- रू असा एकूण ७४३०/- रू बा मुद्देमाल अवैधरीत्या विनापरवाना विक्री करताना मिळुन आल्याने जप्त करून आरोपीतांविरूद्ध पोस्टे केळवद येथे ६५ (ई) मुदाका प्रमाणे कारवाई करण्यात आली.

केळवद पोलीसांनी आरोपी किसना काशी बारंगे वय ४० वर्ष रा जवाहर वार्ड पांढुर्गा (म.प्र) ह. मु शिवराज ढाबा खुर्सापार याचे शिवराज ढाब्याचे किचनमध्ये एका थैलीत देशी दारू संत्रा भिंगरी नं ०१ व्या ११ निपा १८० एम.एल प्रत्येकी कि, ७०/- रु एकूण किमती७७०/-रू. चा माल एकुण १९८० एम, एल. या माल जप्त करून आरोपीविरूद्ध पोस्टे केळवद येथे ६५(ई) मुदाका प्रमाणे कारवाई करण्यात आली.

@ फाईल फोटो
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिवानीशी ठार करणाऱ्या आरोपीतांना कोर्टातुन शिक्षा

Mon Jul 8 , 2024
मौदा :- फिर्यादी नामे पियुष नंदकिशोर चरडे वय २१ वर्षे रा. सावळी ता. कामठी जिल्हा नागपुर यांच्या रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन मौदा येथे अप. क्र. ७२३/२०१९ कलम ३०७, ३०२, ३४२, ३४ भादंवि कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता. दि. ०६/१०/१९ ने २०/३० वा. दरम्यान यातील मृतक इसम नामे आकाश उर्फ गोलू श्रावण सोनटक्के वय २५ वर्षे रा. सावळी ता. कामठी जिल्हा नागपुर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com