सार्वजनिक वाचनालय कन्हान च्या सदस्याची स्पर्धा परिक्षेतुन निवड झाल्याने सत्कार

कन्हान : – सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर कन्हान येथुन स्पर्धा परीक्षेची पुर्व तयारी करणारे वाचनालयाचे सभासद मनिष मानकर यांची आयुध निर्माणी (डिफेन्स) मध्ये व निलगेश बर्वे यांची बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (बीआरओ) लेह लदाख येथे निवड होऊन नौकरी मिळाली असल्यामुळे या दोघा चा सार्वजनिक वाचनालय कन्हान अध्यक्ष वासुदेव राव चिकटे यांच्या अध्यक्षतेत प्रमु़ख अतिथी सुभाष राव घोगले, प्रकाशजी नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिनंदन करून शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सार्वजनिक वाचना लयाचे सचिव मनोहरराव कोल्हे, कोषाध्यक्ष दिनकररा व मस्के, ग्रंथपाल श्याम बारई, लिपीक कृनाल कोल्हे,  रोशन तांडेकर, राहुल पारधी, नितीन मोहने, सुरेंद्र नेवारे, रवी राणे, शुभम शेंडे, आशिष तांडेकर, अतुल खोब्रागडे, अभिषेक निमजे, उदय पाटील आदी सभासद आणि वाचक मंडळी उपस्थितीत होते. या वेळी प्रमुख मान्यवरांनी दोघांचे अभिनंदन करून असेच सर्व सभासदांनी जास्तीत जास्त अभ्यास व मेहनत घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करावी आणि यशस्वी होऊन सार्वजनिक वाचनालयाच्या सेवा सुवि धेचा लाभ घ्यावा असे उपस्थितांना संबोधित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन मनोहरराव कोल्हे तर आभार प्रदर्शन श्याम बारई यांनी करून सत्कार मुर्तीं ना पुढिल वाटचालीस शुभेच्छा देऊन सर्वाना अल्पोहा र देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

लालफीत, दफ्तरदिरंगाई सारख्या शब्दांना हद्दपार करत राज्याच्या प्रगतीची गती कायम ठेवा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Thu Apr 21 , 2022
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानातील विजेत्यांना पारितोषिके   मुंबई दि. 21 : लालफीत, दफ्तरदिरंगाई या शब्दांना हद्दपार करत सर्वसामान्यांच्या सुखासाठी काम करताना  राज्याच्या प्रगतीची “गती” कायम ठेवा असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.             मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानातील 18 पुरस्कारांचे वितरण आज करण्यात आले. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या कार्यक्रमास  महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, खासदार अरविंद सावंत, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सामान्य प्रशासन विभागाचे अपर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com