देविका हा उत्तर भारतातील पहिला नदी पुनरुज्जीवन प्रकल्प पूर्णत्वाच्या जवळ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रकल्पाची केली होती पायाभरणी : डॉ जितेंद्र सिंह

मुंबई :- देविका हा उत्तर भारतातील पहिला नदी पुनरुज्जीवन प्रकल्प पूर्ण होण्याच्या बेतात आहे अशी माहिती, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंह यांनी आज दिली. ‘नमामि गंगा’ प्रकल्पाच्या धर्तीवर, 190 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून बांधण्यात आलेल्या या प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले. जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर येथील पवित्र अशा देविका नदीची शुद्धता जपण्यासाठी स्वतंत्रपणे हाती घेतलेल्या द्रव कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत , डॉ जितेंद्र सिंह बोलत होते.

द्रव कचरा व्यवस्थापन प्रकल्पासोबतच, देविका नदीची शुद्धता आणि पावित्र्य राखण्यासाठी अनेक दृष्टीने महत्त्वाचा असणारा एक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प देखील, देविका पुनरुज्जीवन प्रकल्पा अंतर्गत उभारण्यात येणार आहे, अशी माहितीही डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिली.

मोठ्या विकासात्मक प्रकल्पांच्या यशस्वी पूर्ततेसाठी, समाजाच्या तळागाळाचे प्रतिनिधी म्हणून पी आर आय अर्थात पंचायत राज संस्थांची भूमिका महत्त्वाची आहे, असेही या बैठकीत डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले. बैठकीत उपस्थित पी आर आय च्या प्रतिनिधींनी मंत्र्यांसमोर अनेक समस्या मांडल्या आणि या समस्या कमीत कमी वेळेत सोडवण्याचे निर्देश, मंत्री महोदयांनी विभागांना दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Sentence of Rape convict suspended by High Court

Mon Aug 7 , 2023
Nagpur :- Justice Urmiala Phalke Joshi has suspended the sentence and granted bail to convict Mohd Nazim @Nadim Mohd Hussain R/ o Old City Akola. Mohd Nazim @Nadim Mohd Hussain was sentenced to undergo 10 years of Imprisonment by Addl Sessions Judge, Akola vide judgement dated 3-05-2023. It was the case of prosecution that, on 28.6.2017, the complainant lady, mother […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!