संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी नेते घडवले, फडणवीस यांनी कुणाला घडवले? त्यांनी तर नेते चोरले
कामठी :- देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा सत्यानाश केला बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी नेते घडवले फडणवीस यांनी कुणाला घडवले? त्यांनी तर नेते चोरली असा घाणाघात शिवसेना उध्दव ठाकरे यांच्या पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या वर जोरदार घाणाघात केला.
त्या काल 11 एप्रिल गुरूवार ला रामटेक लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे कॉग्रेसचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांच्या प्रचारार्थ येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पटांगण येथे आयोजित सभेत बोलत होत्या. त्यांनी आपल्या 36 मिनिटांच्या भाषणात भाजपवर कडाडून टीका केली. त्या म्हणाल्या, आपण अत्यंत जाती वादी लोकांना निवडून देणे ही आपली मोठी चुक आहे. ईडी सीबीआय न्याय व्यवस्था या सगळया स्वायतता यंत्रणा वर दबाव आणण्याचं आणि त्यांना प्रभावित करण्याचे काम भाजपा कडून होतोय. भाजप सातत्याने या सर्व स्वायतता यंत्रणेचा गैर वापर करतंय. देशाचा गाडा ज्या भाजपाच्या हातात चालवायला दिले त्या भाजपचे महाराष्ट्राचे करते धरते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा सत्यानाश केला. 2012 ला ज्या रश्मि बर्वे चे जात प्रमाणपत्र अवैद्य आहे हे दिसले नाही. तेव्हा ते वैद्य होते. 2019 सुध्दा त्यांचे जात प्रमाण पत्र वैद्य होते. आणि आता लोकसभा निवडणुकीच्या वेळी अचानक त्यांचे जात प्रमाणपत्र अवैद्य होते?, असा नेमका कोणता कायदा कोणती कलम कोणती प्रोसिजर देवेंद्र नी त्यांच्या साठी शिरोधार्य मानली. त्याचे उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. असा सवाल त्यांनी यावेळी केला. भाजप कडून गलिच्छ राजकारण केले जात आहे.
देवेद्र फडणवीस न्यायालयापेक्षाही हुशार झाले आहे का? असा सवालही त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस हुशार माणुस नाही. देवेंद्र फडणवीस म्हणजें कपटी माणूस आहे. ते चाणक्य सुध्दा वाटत नाही. नेंते घडवतो तो चाणक्य.. बाळासाहेब ठाकरे यांनी नेते घडवले. शरद पवार यांनी सुध्दा नेते घडवले. देवेंद्रजीनी कुणाला घडवलं. देवेंद्र फडणवीस नी माणसं घडवले नाही चोरले. स्वायतता यंत्रणांचा गैरवापर करते म्हणून भाजपला हरवायचे आहे. इलेक्ट्रॉल बॉंण्ड च्या नावाने भारतीयांची फसवणुक केली त्यांना धडा शिकवायचा आहे. जाती पाती वर दंगली पसरवणा-या भाजपला हरवायचे आहे. हिंदु मुस्लिम दंगली घडवण्याच्या प्रयत्नांला यश आले नाही तर नंतर ओबीसी मराठा वाद पेटवला. स्वताच्या पोराला उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार नाही त्याबद्दल मला काहीच बोलायची गरज नाही असे बोलून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चिमटाच घेतला. करप्शन करनेवालों को भाजपा में एन्ट्री यही मोदी की गॅरेंटी. जितना बडा करप्शन करेगा उतना बडा पोजिशन दिया जायेगा. जेवढी मोठी करप्शनची फाईल तेवढं मोठं पद हीच मोदी ची गॅरंटी असल्याचे त्यांनी सांगितले.
हुकूमशाही दडपण्याकरिता आपल्या सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे रश्मि बर्वे यांनी यावेळी सांगितले. माझ्या उमेदवारी बद्दल भाजप ने कटकारस्थान केले असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर, माजी जी प अध्यक्ष रश्मी बर्वे ,शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे जिल्हा उपप्रमुख राधेश्याम हटवार, माजी नगराध्यक्ष शकुर नागानी, पंचायत समितिच्या सभापती दिशा चनकापुरे यांनी मार्गदर्शन केले. मंचावर शिवसेनेचे देवेंद्र गोंडबोले, माजी नगराध्यक्ष शाहजहां शफाअत, नीरज यादव, प्रमोद मानवटकर, सरपंच सरिता रंगारी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तापेश्वर वैद्य, कृषी उत्पन्न बाजार समिती मुबई चे सभापती हुकूमचंद आमधरे, जिल्हा परिषदेच्या सभापती अवंतिका लेकुरवाळे, कामठी नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष काशीनाथ प्रधान, माजी नगरसेवक नीरज लोणारे, माजी नगरसेविका वैशाली मानवटकर, राजा तिडके, लक्ष्मण संगेवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश दुबे तर संचालन नितेश यादव यांनी केले.