विमानतळावरील पायाभूत सुविधांचा विकास

भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि इतर विमानतळ विकासकांनी येत्या पाच वर्षात विमानतळ क्षेत्रात अंदाजे 98,000 कोटी रु. भांडवली खर्चाचे लक्ष्य ठेवले आहे

नवी दिल्‍ली :-विमानतळावरील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा आणि आधुनिकीकरण ही एक निरंतर प्रक्रिया असून भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि इतर विमानतळ विकासक सातत्याने यादृष्टीने कार्य करत असतात. हे कार्य जमिनीची उपलब्धता, व्यावसायिक व्यवहार्यता, सामाजिक-आर्थिक विचार, वाहतूक मागणी/विमानकंपन्यांची अशा विमानतळांवर किंवा विमानतळावरून सेवा देण्याची इच्छा या घटकांवर अवलंबून असते. देशातील सध्याची टर्मिनल्स, नवीन टर्मिनल्स आणि धावपट्टी व्यवस्थित करण्यासाठी, इतर कामांसह विस्तार आणि सुधारणा याकरता भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि इतर विमानतळ विकासकांनी येत्या पाच वर्षात विमानतळ क्षेत्रात, अंदाजे 98,000 कोटी रुपये भांडवली खर्चाचे लक्ष्य ठेवले आहे.

नऊ कार्यान्वित ग्रीनफिल्ड विमानतळांचा प्रकल्प खर्च याप्रमाणे आहे : दुर्गापूर – 670 कोटी रुपये, शिर्डी- 320 कोटी रुपये, पाक्योंग- 553.53 कोटी रुपये, कन्नूर- 2342 कोटी रुपये, कलबुर्गी- 175.57 कोटी रुपये, ओरवाकल (कुर्नूल)- 187 कोटी रुपये, सिंधुदुर्ग- 520 कोटी रुपये, कुशीनगर-448 कोटी रुपये आणि डोनी पोलो, इटानगर-646 कोटी रुपये, याशिवाय, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, लखनौ, मंगळुरू, गुवाहाटी आणि अहमदाबाद विमानतळांकरता 2019-25 या कालावधीसाठी भांडवली खर्च अनुक्रमे 10,550 कोटी रुपये, 13,552 कोटी रुपये, 6,288 कोटी रुपये, 1,383 कोटी रुपये, 567 कोटी रुपये, 1,232 कोटी रुपये आणि 376 कोटी रुपये इतका आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

PM pays homage to Sardar Patel on his Punya Tithi

Fri Dec 16 , 2022
New Delhi :-The Prime Minister,  Narendra Modi has paid homage to Sardar Patel on his Punya Tithi and recalled his everlasting contribution to India. In a tweet, the Prime Minister said; “I pay homage to Sardar Patel on his Punya Tithi and recall his everlasting contribution to India, especially in uniting our nation and giving impetus to all-round development.” — […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com