देसी अँप ‘कू’नं ओलांडला 2 कोटी डाउनलोड्सचा टप्पा, वर्षभरात केली ‘ही’ लक्षवेधी कामगिरी

5 जानेवारी 2022: भारतीय मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ‘कू’साठी 2021 हे अगदीच अविस्मरणीय वर्ष ठरले. 2 कोटी डाउनलोड्सचा टप्पा गाठत कू वेगाने वाढणारा भारतीय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून लोकप्रिय होतो आहे. ‘कू’चा बहुभाषिक मंच भारतीयांना मातृभाषेत व्यक्त होण्यासाठी अवकाश मिळवून देतो. ‘कू’ने मागच्या वर्षभरात विविध पातळ्यांवर अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली. त्याची ही झलक.

2 कोटी डाउनलोड्स

डिसेंबर 2021 च्या मध्यावधीत ‘कू’ने 2 कोटी डाउनलोड्सचा अभिमानास्पद टप्पा गाठला. कूच्या वेगवान वाढीत अनेक घटना-घडामोडींचा वाटा आहे. त्यात महत्त्वाचा ठरला तो 2021 चा टी-20 वर्ल्ड कप. वर्ल्डकपदरम्यान क्रिकेटफॅन्सना ‘कू’ने #SabseBadaStadium कॅम्पेनच्या माध्यमातून एक खास अनुभव दिला. दर्जेदार तंत्रज्ञान आणि सक्षम भाषांतर फीचर्सच्या बळावर कू येत्या वर्षात 10 कोटी डाउनलोड्सचा टप्पा गाठायला तयार आहे.

बहुभाषिक विस्तार  

2020 मध्ये पहिल्यांदा कन्नड भाषेत सुरू झालेले ‘कू’ ॲप आता एकूण 10 भाषांमध्ये उपलब्ध आहे. मराठी, हिंदी, कन्नडा, गुजराती, तमिळ, तेलुगू, पंजाबी, बंगाली, आसामी आणि इंग्रजी. ‘कू’चा मंच अगदीच सर्वसमावेशक आहे. इथे युजर्सना डिजीटल पातळीवर भाषिक अडथळे ओलांडत अगदी मोकळेपणाने व्यक्त होण्याची संधी मिळते. विशेष म्हणजे पोस्ट करतानाच आशयाला धक्का न लावता विविध भाषांमध्ये ती अनुवादित करून मिळण्याचीही सुविधा ‘कू’ देते. भविष्यात सगळ्या 22 अधिकृत भारतीय भाषांमध्ये सेवा देण्याच्या तयारीत ‘कू’ आहे.

एशिया पॅसिफिक स्तरावरचा सन्मान

‘कू’ने 2021 मध्ये एशिया पॅसिफिक (एपीएसी) क्षेत्रातल्या लोकप्रिय 5 उत्पादनांमध्ये स्थान मिळवण्याचा बहुमान मिळवला. ‘अॅम्प्लिट्यूड’च्या 2021 च्या प्रॉडक्ट रिपोर्टमध्ये हे जाहीर करण्यात आले.

एपीएसी (APAC)  युएस (US) आणि इएमइए (EMEA) क्षेत्रामधून या अहवालात मानांकन मिळवणारा ‘कू’ हा एकमेव सोशल मीडिया ब्रॅन्ड ठरला. भारतीय ब्रॅन्ड्सपैकी दोनच ब्रॅन्ड्सना हा बहुमान मिळालेला आहे. ‘कू’सोबतचा दुसरा ब्रॅन्ड आहे कॉइनसीडीएक्स (CoinDCX).

अॅम्प्लिट्यूडच्या वर्तन आलेखातला (बिहेविअरल ग्राफ) डाटा, आपलं डिजीटल जीवन घडवणाऱ्या नव्या, आगळ्यावेगळ्या डिजीटल उत्पादनांना समोर आणतो. या रिपोर्टने ‘कू’विषयी बोलताना म्हणले, “हा एक आगळावेगळा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, जो अस्सल भारतीयांना आपापल्या खास भाषांमध्ये व्यक्त होण्याची संधी देतो. कू 1 अब्जाहून जास्त भारतीयांचे आवडते ॲप बनण्यासाठी अगदीच तत्पर आहे.”

डिजीटल अवकाशात भाषेच्या योग्य वापरासाठीचे प्रयत्न

म्हैसूरमधील ‘सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लँग्वेजेस’ (CIIL) आणि Bombinate Technologies Pvt Ltd यांनी एका संयुक्त सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. बॉम्बिनेट टेक्नॉलॉजीज ही भारताच्या बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म, कू (Koo)ची होल्डिंग कंपनी आहे. सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासह भाषेच्या योग्य वापराला प्रोत्साहन देण्यासाठी या दोघांनी हा सामंजस्य करार (MoU) केला. भारतीय भाषांच्या विकासामध्ये समन्वय साधण्यासाठी भारत सरकारने CIIL ची  स्थापन केलेली आहे. आता CIIL ‘कू’ ॲप सोबत एकत्र काम करणार आहे. यातून भाषिक धोरणे मजबूत होतील आणि सोबतच युजर्सना ऑनलाइन सुरक्षा मिळणे सोपे होईल. यासह हा करार ऑनलाइन गैरकृत्ये, गुंडगिरी आणि धमक्यांपासून रक्षण करण्याच्या दृष्टीनेही उपयोगी ठरेल.

या उपक्रमाच्या माध्यमातून CIIL संस्था 22 भाषांमध्ये आक्षेपार्ह किंवा संवेदनशील मानले जाणारे शब्द, वाक्प्रचार, संक्षेप आणि संक्षिप्त शब्दांचा एक डेटा तयार करेल. ‘कू’ ॲप हा संग्रह तयार करण्यासाठी गरजेचा डेटा एकत्रित करेल आणि सोबतच असे इंटरफेस तयार करण्यासाठी आवश्यक ती तांत्रिक व्यवस्थाही दोन वर्ष पुरवेल. भारतीय भाषांचा ऑनलाइन समाजमाध्यमांवर आदर्श वापर केला जावा यासाठीची ही दीर्घकालीन मोहिम असणार आहे.

 

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

Aur Bhai Kya Chal Raha Hai? completes 200 episodes!

Wed Jan 5 , 2022
&TV’s situational comedy show Aur Bhai Kya Chal Raha Hai? has been a constant entertainer with its Lucknowi Andaz and funny banters between the two culturally opposite families of Mishras (Ambrish Bobby and Farhana Fatema) and Mirzas (Pawan Singh and Akansha Sharma) cohabiting in one haveli. The successful completion of its 200 episodes testifies the strong connection with viewers across […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com