नागपूर :- उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज देवगिरी शासकीय निवासस्थानी जनतेशी संवाद साधला व विविध निवेदने स्वीकारली.
शासन आपल्या दारी कार्यक्रमातील सहभागानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांना भेटण्यासाठी व आपल्या समस्या मांडण्यासाठी नागपुरच्या विविध भागातील नागरिकांनी देवगिरी बंगल्यावर एकच गर्दी केली होती.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी येथील सभागृहात नागरिकांची भेट घेतली ,त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांची निवेदने स्वीकारली.
वेगवेगळ्या सामाजिक संस्था, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी आपल्या विविध मागण्या उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मांडल्या. उपमुख्यमंत्र्यांनी प्रत्येकाचे निवेदन स्वीकारत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.