जलयुक्त शिवार अभियान 2.0 मधील कामे तातडीने पूर्ण करावी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

– जलयुक्त शिवार अभियान 2.0 चा आढावा

मुंबई :- ‘जलयुक्त शिवार अभियान 2.0’ हे राज्य शासनाचे महत्वाकांक्षी अभियान आहे. या अभियानांतर्गत कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी हा कालावधी अनुकूल आहे. या अभियानात कृषी विभागाचा सहभाग वाढवीत कामांना गती द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार अभियान 2.0 चा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे (दूरदृश्य संवाद प्रणालीव्दारे),मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियानासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. जो जिल्हा अधिक वेगाने कामे करेल, त्या जिल्ह्याला अधिक निधी दिला जाईल. लातूर, भंडारा, सोलापूर, सांगली, पुणे या 5 जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा वेगाने प्रगती झाली आहे. इतर जिल्ह्यांनीही कामे अधिक वेगाने करावीत.

जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यातील यश लक्षात घेता, राज्य शासनाने ‘जलयुक्त शिवार अभियान 2.0’ चा दुसरा टप्पा सुरू केला आहे. ज्यामध्ये पाणलोट विकास उपक्रमांच्या विविध कामांचा समावेश आहे, यामुळे पावसावर आधारित शेतीच्या समस्या कमी होण्यास मदत होऊन शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्यास मदत होणार आहे.

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेत धरणातील व गावतळ्यातील साठलेला गाळ काढून टाकून त्यांची साठवण क्षमता वाढविण्याबरोबरच या गाळाचा वापर शेतशिवारामध्ये करून, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीची गुणवत्ता वाढवण्यासाठी फायदा होईल, ज्यामुळे उत्पादन क्षमतेत वाढ होईल. या वर्षात, आत्तापर्यंत, 565 तलावातून सुमारे 83.39 लाख घनमीटर गाळ काढण्यात आला आहे, ज्यामुळे जवळपास 6000 लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना अनुदानाचा फायदा झाला आहे. या योजनेसाठी शांतीलाल मुथा आणि भारतीय जैन संघटनेचे तसेच इतर स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेत आहोत. त्यांना जिल्हा प्रशासनाने पूर्ण सहकार्य करावे असे निर्देशही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

कृषी मंत्री मुंडे आणि मुथा यांनी जलयुक्त शिवार अभियान आणि गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियानासाठी विविध सूचना केल्या. त्यांचीही कृषी व जलसंधारण विभागाने दखल घ्यावी असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मृद व जलसंधारण विभागाचे सचिव सुनील चव्हाण यांनी जलयुक्त शिवार अभियान 2.0 च्या कामांच्या प्रगतीचा अहवाल सादरीकरणाव्दारे सादर केला. यावेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार, ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी, कृषी आयुक्त प्रवीण गेडाम,मृद व जलसंधारण आयुक्त प्रकाश खपले, कोकण विभागीय आयुक्त डॉ. ‌महेद्र कल्याणकर, मुथा आणि भारतीय जैन संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीव्दारे उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्य शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी 2500 कोटींच्या रोख्यांचा 30 जानेवारीला लिलाव

Thu Jan 25 , 2024
मुंबई :- राज्य शासनाच्या विकास कार्यक्रमासंबधित खर्चासाठी 11 वर्षे मुदतीच्या 2500 कोटींच्या रोख्यांची विक्री करण्यात येणार असून, या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा वापर शासनाच्या विविध विकास कामास अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाणार आहे, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे. राज्य शासनाच्या सर्वसाधारण अधिसूचनेमधील अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या 10 टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com