उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली मेट्रो सफारी

– प्रवाशांची साधला संवाद

– मेट्रोचा वापर करण्याचे नागरिकांना आवाहन

नागपूर :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सिताबर्डी ते खापरी अशी नागपूर मेट्रोची सफारी करून प्रवाशांशी संवाद साधला. शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी मेट्रोचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.

मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डिकर, संचालक अनिल कोकाटे व राजीव त्यागी तसेच सारंग गडकरी यावेळी उपस्थित होते.

मेट्रो रेल्वेकडून असलेल्या अपेक्षा व सूचना पवार यांनी प्रवाशांकडून जाणून घेतल्या. मेट्रो रेल्वेमुळे वेळेची व पैशाची बचत होत असल्याचे सुमित मोरे या परभणी येथून नागपूरात नोकरीनिमित्त स्थायीक झालेल्या प्रवाशाने सांगितले. इतर प्रवाशांनी देखील मेट्रो बाबत समाधानी असल्याचे सांगितल्यावर उपमुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला. केंद्र व राज्य शासनाकडून मेट्रो रेल्वे प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते, त्यानुसार प्रवाशांना आवश्यक सोयी सुविधा पुरविण्याचे तसेच स्वच्छतेची सवय लावण्याच्या सूचना श्री पवार यांनी मेट्रोरेल्वे प्रशासनाला केल्या. तत्पुर्वी त्यांनी सिताबर्डी इंटरचेंज स्थानकाची पाहणी केली तसेच येथील दुकानदारांच्या समस्या जाणून घेतल्या.

नागपूरच्या हिरवळीचे कौतुक

प्रवासादरम्यान रेल्वेतून दिसत असलेल्या शहरातील विविध स्थळांची माहिती उपमुख्यमंत्री पवार यांनी हर्डिकर यांचेकडून घेतली. नागपुरात सर्वत्र दिसत असलेल्या हिरवळीचे त्यांनी यावेळी कौतुक केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

खासदार क्रीडा महोत्सवाच्या तारखांची घोषणा रविवारी

Sat Dec 16 , 2023
– आंतरराष्ट्रीय ॲथलिट हिमा दास यांच्या हस्ते होणार ध्वज वितरण नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार होणाऱ्या सहाव्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या तारखांची घोषणा रविवारी १७ डिसेंबर २०२३ रोजी होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेत कस्तुरचंद पार्क जवळील किंगस्वे हॉस्पिटल इमारतीतील भाई बर्धन स्मृती सभागृहामध्ये रविवारी (ता.१७) सकाळी ११.३० वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!