संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 3 :- कामठी तालुक्यात अनेक सर्पमित्र घरात किंवा वस्तीत वा इतरत्र कुठेही दृष्टीस पडलेल्या साप, अजगर सारख्या सापांसोबत नागरिकांचेही जीव सर्पमित्र वाचवीत असतात मात्र त्यांना शासनाकडून कोणतीही मदत मिळत नाही .शासकीय योजनेचे शाश्वत कवच सर्पमित्राणा दिले जात नाही.ही एक शोकांतिकाच मानावी लागेल.
कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागात कुठेही साप, अजगर यासारखे प्राणी आढळल्यास सर्वप्रथम प्राधान्याने सर्पमित्राना बोलाविण्यात येते यावेळी सर्पमित्र माहिती मिळताच आपली जवाबदारी स्वीकारून निस्वार्थपणे घटनास्थळ गाठून भीतीदायक असणाऱ्या साप,अजगर सारख्या प्राण्यांना पकडून नागरिकांना संरक्षण देण्याचे सामाजिक दायित्वाची भूमिका साकारत आहेत सद्यास्थीतीत कामठी चे सर्पमित्र वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी चे सदस्य अनिल बोरकर यांचे नाव प्राधान्याने समोर येत असून इतरही सर्पमित्र आपली कर्तव्यदक्ष भूमिका निस्वार्थपणे साकरत आहेत.मात्र यांना शासकीय योजनेची कुठलीही मदत मिळत नाही तसेच नागरिकांचे जीव वाचविणाऱ्या या सर्पमित्रांना शासकीय योजनेचे कुठलेही शाश्वत कवच मिळत नाही ही एक शोकांतिकाच मानावी लागेल.
वन्यजीव संरक्षण कायद्या अंतर्गत कायदेशीर प्रत्येक सापाला संरक्षण देण्यात आले आहे इतकेच नव्हे तर वाघ, अस्वल , बिबट्या यांची हत्या करनाऱ्या मनुष्यवर ज्याप्रमाने कायदेशीर कारवाही होते त्याचप्रमाणे सापांना मारणाऱ्यावरही कारवाही केली जाते .प्रत्येक साप जगावा आणि तो आपल्या अधिवासात पुन्हा सुखरुप जावा यासाठी जीवावर उदार होऊन विशेष प्रयत्न करणाऱ्या सर्पमित्रणा सुरक्षेच्या दृष्टीने केंद्र व राज्य शासनाच्या कुठल्याही योजने अंतर्गत कवच देण्यात आलेले नाही याबाबत सर्पमित्रात नाराजगीचा सूर वाहत आहे.सापाची आणि अन्य वन्यजीवांची हत्या करणे , त्याच्या निवासस्थानाला हानी पोहोचविणे , त्याची तस्करी कींवा कातडी काढून विक्री करने, बंदिवासात डांबून ठेवणे आदी कृत्य हे वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 सुधारणा कायदा 2002 अनव्ये गुन्हाच ठरतो अशा गुन्हेगारांना जास्तीत जास्त सात वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा व 25 हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात .रानडुक्कर , वाघ, अस्वल , बिबट्या आदी वन्यप्राण्यांची हल्ला करून एखाद्या व्यक्तीला जखमी, गंभीर जखमी किंवा गतप्राण केल्यास त्या कुटुंबाला शासकीय मदत दिली जाते परंतु जीवावर उद्गार होऊन साप मनुष्य संघर्ष टाळण्यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती किंवा नोंदणीकृत सर्पमित्रांना सर्पदंश झाल्यास त्याच्या कुटुंबाला कुठलीही शासकीय मदत दिली जात नसल्याचे वास्तव आहे.