संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- नुकतेच सार्वजनिक भीम स्मूर्ती मंडळ कामठी कार्यालयात संपन्न झालेल्या भारतीय संविधान दिन गौरव समिती कामठी च्या विशेष सभेत भारतीय संविधान दिन गौरव समिती कामठी च्या अध्यक्षपदी आंबेडकरी चळवळीचे नेते विजय पाटील निवड करण्यात आली,उपाध्यक्ष पदी मनोहर गणवीर तसेच महासचिव पदी विद्या भीमटे,सचिव कोमल लेंढारे, कोषाध्यक्ष दिपंकर गणवीर यांची नियुक्ती करण्यात आली तसेच इतरांना कार्यकारिणीत सदस्यपदी सहभागी करण्यात आले.या नवनियुक्त अध्यक्ष विजय पाटील सह कार्यकरिणीतील समस्त पदाधिकारी व सदस्यांचे प्रोग्रेसिव्ह मूव्हमेंट कामठी च्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी पोग्रैसिव्ह मुहमेन्ट कामठी चे पदाधिकारी प्रमोद खोब्रागडे, राजेश गजभिये, विकास रंगारी, गितेश सुखदेवे, आशिष मेश्राम, मंगेश खांडेकर, राजन मेश्राम,सुमीत गेडाम, आनंद गेडाम, मनोज रंगारी, रायभान गजभिये यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.