नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क. २ पथकाचे अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाणे सिताबर्डी हद्दीत आरोपींचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना माहिती मिळाली की, पोलीस ठाणे सदर हद्दीतुन हरपार असलेला आरोपी विनोद राठोर हा विनापवरवाना हद्दीमध्ये रेल्वे स्टेशनचे मेन गेट जवळ फिरत आहे, अशा मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून त्या ठिकाणी गेले असता, त्याठीकाणी एक संशयीत ईसम हा पोलीसांना पाहुन पळुन जात असता, त्यास सापळा रचुन ताब्यात घेवुन, त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नाव विनोद ददनसिंग राठोर, वय ४५ वर्ष, रा. खलासी लाईन, मोहन नगर, नागपूर असे सांगीतले, आरोपीचा अभिलेख तपासला असता, आरोपीस पोलीस ठाणे सदर येथुन पोलीस उप आयुक्त परि, क. २ यांचे आदेश क. ५/२०२४ नुसार दिनांक २०.०५.२०२४ रोजी पासुन ०१ वर्षा करीता नागपूर शहर व नागपूर ग्रामीण हद्दीतुन हरपार केल्याचे दिसुन आले. आरोपी हा विनापरवाना हद्दीत मिळुन आल्याने, व त्याने हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी फिर्यादी नापोअं. कमलेश गनेर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे सिताबर्डी येथे आरोपीविरूध्द कलम १४२ म.पो.का. अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस पुढील कारवाईकामी सिताबर्डी पोलीसांचे ताब्यात देण्यात आले.
वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपूर शहर, निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, संजय पाटील अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नागपूर शहर, राहुल माकणीकर, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), अभिजीत पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली, मपोनि, शुभांगी देशमुख, पोहवा. नरेश तुमडाम, नापोअं, कमलेश गणेर, प्रविण शेळके, सुरेश तेलेवार, आशिष धंदरे, कमलेश गहलोत यांनी केली.