नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क. ३ पोलीसांचे पथक पोलीस ठाणे शांतीनगर हद्दीत अवैध धंदे व गुन्हेगाराचे शोधात पेट्रोलीग करीत असतांना, त्यांना गुप्त बातमीदाराकडुन मिळाली की, लालगंज झाडे चौक, नागपूर येथे एक हद्दपार ईसम हा सार्वजनिक ठिकाणी हातात शस्त्र घेवुन धुमधाम करीत आहे. अशा माहितीवरून नमुद ठिकाणी गेले असता, एक ईसम हा हातात शख घेवुन दिसल्याने त्यास स्टाफचे मदतीने ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता, त्याने आपले नाव धनंजय उर्फ स्वप्नील ज्ञानेश्वर वैरागडे, वय ३० वर्षे, रा. लालगंज, झाडे चौक, नागपूर असे सांगीतले, आरोपीचे जवळुन एक लोखंडी चाकु किंमती अंदाजे २००/- रू. चा जप्त करून व आरोपीचा अभिलेख तपासला असता तो पोलीस ठाणे शांतीनगर येथुन हद्दपार असल्याचे समजले, आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाई कामी पोलीस ठाणे शांतीनगर यांचे ताब्यात देण्यात आले.
आरोपी हा कोणतातरी दखलपात्र गुन्हा करण्याने उद्देशाने शस्त्र बाळगताना समक्ष मिळून आल्याने तसेच, त्याने मा. सह पोलीस आयुक्त साहेब, नागपुर शहर यांचे मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याने पोहवा विजय श्रीवास यांनी दिलेल्या तकारीवरून पोलीस ठाणे शांतीनगर येथे पोउपनि चादिकर ९९२३७१२४१० यांनी आरोपीविरूध्द कलम ४/२५ भा.ह.का., सहकलम १३५, १४२ म.पो.का. अन्वये गुन्हा नोंदवुन, आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
वरील कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनात, युनिट क. ३ चे अधिकारी व अंमलदार यांनी केली.