देवलापार पोलीसांनी अवैध गोवंश वाहतुक करणाऱ्या ट्रक वाहन चालकास पकडून १९ गोवंश यांना दिले जिवनदान

देवलापार :- अंतर्गत ०.५ कि. मी. अंतरावरील मौजा देवलापार ते रामटेक रोड येथे दिनांक ०२/०८/२०२३ चे २२.३० वा. ते २३.३० वा. दरम्यान देवलापार पोलीस पथक पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना गुप्त माहिती मिळाली की, एक इसम बिनापरवाना व अवैधरीत्या जनावरांना निर्दयतेने कोंबुन वाहतुक करीत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहिती वरून देवलापार पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी जावून नाकाबंदी करून आरोपी १० ट्रक चक्का चालक गाड़ी क्र. एम. एच. ४० / ए ६१४७ चा चालक फरार आरोपी याने आपल्या ताब्यातील १० चक्का ट्रक हा बेदरकारपणे लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने चालवून ट्रकमध्ये १९ गोवंश जनावरे अत्यंत कुर व निर्दयतेने वाहनात डांबुन आखुड दोरीने पाय व तोंड बांधून अपुऱ्या जागेत कोंबुन नेत असल्याने मुखवीरच्या माहीती वरून पोलीस स्टेशन देवलापार येथे नाकाबंदी लावण्यात आली व नाकाबंदी दरम्यान सदर १० चक्का ट्रकचालक गाड़ी क्र. एम. एच. ४० / ए – ६१४७ चा चालकाने आपले वाहन न थांबवता डिवायडरला जाऊन धडक दिली व ट्रक चालकने ट्रक साईडला थांबुन पळून गेला. सदर ट्रक क्र. एम. एच. ४० ए ६१४७ मधुन १९ जिवंत गोवंश जनावरे एकुण किंमती १,९०,०००/- रु. १० चक्का ट्रक चालक गाडी क्र. एम. एच. ४० ए. – ६१४७ किमती अंदाजे १५,००,०००/- रू असा एकुण १६.९०,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर प्रकरणी सरकारतर्फे पोश सचिन भगवान येळकर, पो.स्टे. देवलापार यांचे रिपोर्टवरून पो.स्टे. देवलापार येथे आरोपीविरुध्द कलम २७९ ४२७ भा.द.वि सहकलम १२(१) ११ (१) (क) ११ (१), (D), ११ (१), (C). प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम सहकलम ५ अ ९ महाराष्ट्र प्राणि संरक्षण अधिनियम सहकलम ११९ मपोका सहकलम १८४, १३४ ४ १२२, १७७, मोवाका. काद्ययान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. यातील आरोपीचा शोध घेणे सुरू असून गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड पो.स्टे. देवलापार हे करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विनयभंग करणाऱ्या आरोपीला कोर्टातून शिक्षा

Sat Aug 5 , 2023
नागपूर :- पो.स्टे. एमआयडीसी बोरी येथील फिर्यादी / पिडीता वय १४ वर्ष यांच्या रिपोर्ट वरून पो.स्टे. एमआयडीसी बोरी येथे अप. १३६ / २१ कलम ३५४, ३५४ (अ) भादवि सहकलम ८ पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता. यातील अल्पवयीन फिर्यादी / पिडीता व आरोपी नामे सागर सीताराम उईके, वय २० वर्ष रा. बिडगणेशपुर हे एकाच गावात राहत असुन एकमेकांचे घराशेजारी राहतात. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com