नागपूर :- वयस्क लोकांना सन्मानाने वागविले पाहिजे असे शासनाचे धारेण असतांना देखील तसे होतांना दिसत नाही त्याकरीता निवेदन देत असल्याचे संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत वानखडे यांनी म्हटले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार्थी संघटनेने समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड विभाग नागपूर यांना संघटनेच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले .
या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे पुरस्कार्थींना कमीत कमी 1 हजार रुपये मानधन द्यावे. एस.टी प्रवास 4हजार किलोमीटरची मर्यादा ही सवलत काढुन टाकण्यात यावी. एस.टी. प्रवासात एका व्यक्तीसोबत एक व्यक्ती असे पत्र शासनाकडून एस. टी. महामंडळाला द्यावे, महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही बसेसमध्ये सवलत देण्यात यावी, शासकीय विश्रामगृहात आरक्षण देण्यात यावे, वैद्यकिय कार्ड बनवून देण्यात यावे तसेच वैद्यकिय वीमा काढण्यात येवून त्याची किस्त शासनाच्या वतीने भरण्यात यावी, महाराष्ट्र सदन दिल्ली येथे रुम आरक्षण देण्यात यावे, पुरस्कार्थी जर मयत पावले तर त्यांच्या पत्नीला मानधन देण्यात यावे. तसेच पुरस्कार प्राप्त् पुरस्कार्थींचे नावे ही कार्यालयात दर्शनी भागात लावण्यात यावे असे विविध मागण्यांचे निवेदन शासनाकडे सादर करण्याकरीता देण्यात आले.
या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष जीवन गायकवाड, मुख्य सचिव प्रभुदास तायवाडे, बुधाजी सुरकर, शंकरराव वानखडे, प्रभुदास तायवाडे, अशोक भावे, डी.एम कावळे, सुधाताई बावणे, नत्थुजी उकुंडे, कृष्णाजी वानखडे, शंकरराव ठोसर, राजेश खंडारे आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.