गणेश ले आऊट मार्गावरिल जड वाहनांची वाहतुक बंद करण्याची मागणी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :-रमा नगर रेल्वे क्रोसिंग ते गणेश ले आऊट दरम्यान परेश के बालाजी मंदिर रोड वरिल जड वाहनांची वाहतुक बंद करण्याची मागणी भाजप शिष्टमंडळा ने मुख्याधिकारी संदीप बोरकर यांना निवेदना द्वारे केली.

रमानगर रेल्वे क्रोसिंग ते गणेश ले आऊट ला जोड़णारा रविदास नगर येथील पर्यायी मार्ग असताना जड वाहन धारक परेश के बालाजी मंदिर रोड ने वाहन दामटतात हा मार्ग जेमतेम 4 मिटर रुंद असून एका वेळी एक हलके वाहन जाऊ शकते,मार्गा लगत दाट लोकवस्ती आहे जड वाहन चालक बेदरकार पणे वाहन चालवतात त्या मुळे अपघाताची शक्यता आहे, दोन कार जरी समोरा समोर आल्या तर वाहतुक बंद होते,त्यामुळे या मार्गा वरिल जड वाहतुक बंद करण्याची नागरिकांची मागणी आहे, निवेदनावर माजी नगरसेविका संध्या रायबोले सह जवळपास 25 नागरिकांच्या स्वाक्षरी असून निवेदनाची प्रत माजी मंत्री आ चंद्रशेखर बावनकुळे, आ टेकचंद सावरकर, न प प्रशासक एस डी ओ संजय पवार यांना देखील देण्यात आल्या

निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात 

भाजपा कामठी शहर कार्याध्यक्ष राजेश खंडेलवाल,भाजपा पदाधिकारी उज्वल रायबोले, अरविंद चवडे,दिनेश खेडकर, रोहित दहाट,शंकर चवरे,नवीन खोब्रागड़े,सुनिल वक्कलकर यांचा समावेश होता.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ARMY OPENS SITABULDI FORT ON 09 JULY 2023 

Fri Jul 7 , 2023
Nagpur :- Heritage Sitabuldi Fort will be opened to public on 09 July 2023. Public can visit the Historical Fort from 09 AM to 04 PM. The entry to the Fort shall be from Army Recruiting Office gate opposite the Railway Station. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!