वायु प्रदुषणास जबाबदार डंपिंग यार्ड हटवा,खासदार कृपाल तुमाने यांना निवेदन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- नगर परिषद कामठीच्या घन कचरा व्यवस्थापन प्रकल्पातील डंपिंग यार्ड च्या मानव निर्मित आगीमुळे मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण होत असुन डंपिंग यार्ड हटविण्यात यावे अश्या मागणीचे निवेदन भाजपा नागपुर जिल्हा कार्यकारिणी सदस्य उज्वल रायबोले यांनी खासदार कृपाल तुमाने यांना नुकतेच सोपविले.

डंपिंग यार्डतील कचऱ्या ची दुर्गधी आणि वारंवार लावण्यात येणाऱ्या आगी मुळे जूनी छावणी, सुदर्शन नगर, गौतम नगर, नया नगर, जे पी नगर, समता नगर, सैलाब नगर, चंद्रमनी नगर, छत्रपती नगर, कुंभारे कॉलनी, आनंद नगर ईत्यादी परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून त्यांना दमा अस्थमा व श्वसनाचे इतर आजार होत आहेत त्यामुळे डंपिंग यार्ड तातडीने स्थलांतरित करण्याची मागणी करण्यात आली आहे, निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ता नवीन खोब्रागडे उपस्थित होते.

या बाबत भाजपा प्रदेशाध्यक्ष आ चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील माहिती देण्यात आली असून लवकरच तोडगा काढण्यात येईल असे उज्वल रायबोले यांनी स्पष्ट केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मंत्रालयात संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

Sat Feb 24 , 2024
मुंबई :- संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी घनश्याम जाधव, सहायक कक्ष अधिकारी नितिन राणे, राजेंद्र बच्छाव यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. Follow us on Social Media x facebook […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com