संरक्षण क्षेत्राच्या दृष्टीने ही एक सकारात्मक घडामोड – पंतप्रधान
मुंबई :- संरक्षण मंत्रालयाने धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या 928 लाइन रिप्लेसमेंट युनिट्स /उप-प्रणाली/सुटे भाग तसेच इतर घटकांच्या चौथ्या सकारात्मक स्वदेशीकरण सूचीला मंजुरी दिली असल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एका ट्विट द्वारे दिली आहे. यामध्ये उच्च दर्जाची सामुग्री आणि सुटे भाग यांचा समावेश असून त्याचे आयात प्रतिस्थापन मूल्य 715 कोटी रुपये एवढे आहे.
राजनाथ सिंग यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे :
“संरक्षण क्षेत्राच्या दृष्टीने ही एक सकारात्मक घडामोड आहे. यामुळे आपल्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला बळ मिळेल आणि स्थानिक पातळीवरच्या उद्योजकीय प्रतिभेला प्रोत्साहन मिळेल.”