घरफोडी करणारा आरोपी जेरबंद..!

नागपूर – पो.स्टे. पारडी येथील तपास पथक हे हद्दीत पेट्रोलीग करीत असतांना भांडेवाडी रेल्वे स्टेशन लगत मोकळया ठिकाणी अंधारात एक ईसम पायदळ संशयास्पद फिरतांना दिसुन आल्याने त्यास आवाज दिला असता तो पळु लागला त्याचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेवून त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्याने आपले नाव संदीप उर्फ भुऱ्या गणेश लिल्हारे वय 19 वर्ष रा. प्लॅाट न. 49 आराधना नगर सांगितले त्यास घटनास्थळी येण्याचे व पाहून पळण्याचे कारण विचारले असता त्याने उडवाउडवीचे उत्तर दिल्याने त्यास सखोल विचारपूस केली असता त्याने सांगितले की, काही दिवसापुर्वी बीडगाव नागेश्वर नगर भागातील मनसुख लॉन जवळ एका बंद घराचे लॉक तोडुन चोरी केली आहे आरोपी यास अटक करुन त्याच्या जवळुन 1) 06 ग्रॅम वजन असलेली सोन्याची अंगठी कि.अ15,000/रु, 2) 05 ग्रॅम वजन अंदाजे सोन्याची चैन ज्यामध्ये काळे आणी एक छोटे पदक असलेली कि.अ.15,000/रु, 3) 01 जोडी चांदीची पायपटटी वजन अंदाजे चार तोळे कि.अ3,500/रु, 4) एक लोखंडी हथोडा कि.अ. 100/रु असा एकुण 33,600/रु चा मुददेमाल जप्त केला आहे.

सदरची कामगीरी नागपूर शहराचे  पोलीस उपआयुक्त परीमडळ क्र 05, सारंग आव्हाड,  सहायक पोलीस आयुक्त,  नयन आलुरकर यांच्या मागदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके, पोउपनि अमित मिश्रा, पोहवा छगन राउत, नापोशि राजेश नाईक, पोशि मनोज रेहपाडे, रुपेश थुल, गौरव युवते यांनी पार पाडली आहे.

 

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com