संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि रशियाचे संरक्षण मंत्री यांच्यात शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा

नवी दिल्‍ली :- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि रशियाचे संरक्षण मंत्री जनरल सेर्गेई के शोईगु यांच्यात आज दिनांक 28 एप्रिल 2023 रोजी नवी दिल्ली येथे शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर द्विपक्षीय बैठक आणि चर्चा झाली.दोन्ही मंत्र्यांनी द्विपक्षीय संरक्षण सहकार्याच्या विस्तृत मुद्द्यांवर चर्चा केली,ज्यात लष्करी सहयोग तसेच औद्योगिक भागीदारी यांचा समावेश आहे. तसेच त्यांनी ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांद्वारे रशियन संरक्षण उद्योगाचा त्यातील सहभाग आणि त्याला आणखी चालना देण्याच्या मार्गांवरही चर्चा केली.

दोन्ही मंत्र्यांनी प्रादेशिक शांतता आणि सुरक्षा याबाबतही चर्चा केली. दोन्ही देशांमधील विश्वास आणि परस्पर आदर यावर दोन्ही मंत्र्यांनी समाधान व्यक्त केले, तसेच संरक्षण आणि इतर क्षेत्रात आपले साहचर्य मजबूत करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. भारत आणि रशिया यांच्यात परीपूर्ण, दीर्घकाळ टिकणारे आणि काल-सापेक्ष उत्तम संबंधांची त्यांनी दखल घेतली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वानाडोंगरी के स्कुल ऑफ स्कॉलर स्कूल का स्लैब गिरने से एक सुरक्षा कर्मचारी की मौत

Sat Apr 29 , 2023
संवाददाता हिंगना हिंगना :- तहसील के वानाडोंगरी स्थित स्कुल ऑफ स्कॉलर स्कूल में पोर्च का स्लैब गिरने से एक चौकीदार की मौत हो गई। पोर्च के निचे चौकीदार बैठा था। पोर्च का स्लैब चौकीदार पर गिरा जसमे दबकर उसकी मौत हो गई। यह घटना शनिवार को सुबह 11.30 बजे के क़रीब हुई। SOS स्कूल के इमारत के बाहर बना पोर्च […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com