संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 6 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या वारेगाव बाह्य वळण मार्गावरील मंदिरासमोर रस्ता ओलांडत असलेल्या एका हरनाला भरधाव वेगाणे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत हरणाचा जागीच अपघाती मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 11 दरम्यान घडली .
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक भिताडे व वनविभागाचे अधिकारी वाघ यांनी त्वरित घटनास्थळ गाठून हरणाचा मृतदेह ताब्यात घेत पुढील उत्तरीय तपासणीसाठी नागपूर च्या वनविभागात हलविण्यात आले