स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची धडक कारवाई

नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता.13) 4 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 20 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ, गांधीबाग आणि सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 3 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 15,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 4 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल धरमपेठ झोन अंतर्गत फ्रेण्डस कॉलोणी, काटोल रोड येथील कमल फरसान यांच्याविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गांधीबाग झोन अंतर्गत सीए रोड टेलिफोन एक्सचेंज चौक येथील श्याम जनरल स्टोअर्स या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपूरा झोन अंतर्गत राणी दुर्गावती चौक येथील मोहाडिकर क्लॉथ स्टोअर्स या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

त्याचप्रमाणे धंतोली झोन अंतर्गत प्रभाग न.35, न्यू मनीष नगर येथील स्टडी पॉईंट यांच्याविरुध्द विनापरवानगीने विद्युत खांबावर बॅनर / होर्डिंग्ज लावल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

१९ फेब्रुवारीपासुन " भव्य राज्यस्तरीय भिंतीचित्र महोत्सव - भाग २"  

Tue Feb 14 , 2023
वैयक्तीक व गट बनवुन घेता येणार सहभाग हौशी व व्यावसायिक चित्रकारांना संधी प्रथम बक्षीस रोख १ लक्ष ५१ हजार रुपये चंद्रपूर :- डिसेंबर महिन्यात झालेल्या भिंतीचित्र महोत्सवाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे १९ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी दरम्यान राज्यस्तरीय भिंतीचित्र महोत्सव भाग २ आयोजीत करण्यात येत आहे. चंद्रपूर शहर सुशोभीकरण व सौंदर्यीकरण या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित भिंतीचित्र पेंटींग,वृक्ष पेंटींग, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com