15 ऑक्टोबर भारतीय वृत्तपत्र वितरण दिवस जाहीर करा–दिपंकर गणवीर..

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 13 :- 15 ऑक्टोबर हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे दिवंगत डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचा वाढदिवस .हा दिवस सरकारकडून वाचन प्रेरणा दिवस म्हणूनही साजरा केला जातो,डॉ एपीजे अब्दुल कलाम यांना वाचनाची खूप आवड होती याशिवाय त्यांनी आपल्या आयुष्याची सुरुवात वृत्तपत्र वितरणातून केली त्यामुळे हा दिवस भारतीय वृत्तपत्र वितरण दिवस जाहीर करावा अशी मागणी समस्त वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने कामठी तालुका वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष, नागपूर जिल्हा वृत्तपत्र संघटनेचे पदाधिकारी दिपंकर गणवीर यांनी केले आहे.

यासोबतच वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे प्रफुल लूटे, किशोर खेडकर,सुरेश अढाऊ आदींनी सुदधा मागणी केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

'पौर्णिमा दिवसा’ निमित्त आग्याराम देवी मंदिर चौक परिसरात जनजागृती

Fri Oct 14 , 2022
एक तास अनावश्यक वीज दिवे बंद करून नागरिकांचे सहकार्य नागपूर :- नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या सहकार्याने सोमवारी (ता.११) धंतोली झोन अंतर्गत आग्याराम मंदिर चौक परिसरात पौर्णिमा दिवसाच्या निमित्ताने जनजागृती करण्यात आली. जनजागृती उपक्रमादरम्यान ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी परिसरातील व्यापारी बांधवाना, आस्थापनांना भेट देउन तिथे वीज बचतीचे महत्व सांगितले व नागरिकांना किमान १ तास अनावश्यक विद्युत दिवे बंद करण्याचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com