नागपूर :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाव्दारे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी चालविण्यात येणारी शासकीय वसतिगृहाची सन 2022-23 या शैक्षणिक सत्राकरिता प्रवेश प्रकिया पूर्ण करण्यात आलेली असून पहिल्या व दुस-या प्रवेश निवड यादी व्यतिरिक्त रिक्त जागेवर स्पॉट ॲडमिशनची तारीख 15 डिसेंबर निश्चित करण्यात आलेली होती. परंतु काही कारणास्तव स्पॉट ॲडमिशनची तारीख एक दिवस पुढे ढकलण्यात आली असून शासकीय वसतिगृहांच्या स्पॉट ॲडमिशन 16 डिसेंबर रोजी घेण्यात येतील.
शासकीय वसतिगृहातील रिक्त जागेकरिता ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेश अर्ज केलेला आहे परंतु त्यांचा प्रवेश वसतिगृहात झालेला नाही त्यांनी स्पॉट ॲडमिशन करीता 16 डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, सामाजिक न्याय भवन, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसमोर ,श्रध्दानंद पेठ, नागपूर येथे आवश्यक कागदपत्रासह हजर रहावे. विद्यार्थी निर्धारित तारखेस हजर न झाल्यास त्यांचा प्रवेश निश्चित केला जाणार नाही व त्याची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थ्यांची राहील, असे आवाहन सहाय्यक समाज कल्याण आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, रहाटे कॉलनी, वर्धा रोड या कार्यालयाशी संपर्क साधावा.
@फाईल फोटो