संदीप कांबळे, कामठी
व्यसन मुक्ती केंद्राने पोलीसाना माहीती न देता मुतदेह घरी पाठविल्याने घातपाता चा संशय ?
कन्हान : – केरडी येथील व्यसनाच्या आहारी गेलेल्या रंजित ढगे या युवकास वाटोडा नागपुर येथील आधार व्यसन केंद्रात व्यसन मुक्ती करिता दाखल करण्यात आले होते. परंतु केंद्राच्या कर्मचा-यांनी त्याचा मुत्युदेह केरडी येथील घरी आणुन दिल्याने त्याचा मुत्युदेह उघडुन पाहीले असता शरीरावर मारल्याचे व नाका तोंडातुन रक्त निघल्याचे दिसताच गावक-याना संशय आल्याने वाटोडा पोलीस स्टेशन ला व्यसन मुक्ती केंद्रा विरूध्द तक्रार दाखल करून मेडीकल रूग्णालयात शवविच्छेदन करून अहवाल आल्यावर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
पारशिवनी तालुक्यातील केरडी गावातील रहिवासी श्री जनार्धन ढगे हयाना दोन मुले असुन शेती ला जोडधंदा म्हणुन दुधाचा व्यवसाय करतात. लहान मुलगा रंजित जनार्धन ढगे वय २७ वर्ष हा सुध्दा शेती व दुध विक्री करण्यास मदत करायचा परंतु मागील ७, ८ वर्षा पासुन दारू पिप्याचे व्यसन लागुन दारूच्या आहारी गेल्याने त्यांच्या घरच्यानी दारू चे व्यसन सोड विण्या करिता वाटोडा नागपुर येथील आधार व्यसन मुक्ती केंद्रात रंजित ला शुक्रवार (दि.२९) एप्रिल२०२२ ला दाखल करण्यात आले होते. बुधवार (दि.४) मे ला व्यसन मुक्ती केंद्रातुन चार दिवसानी घरच्याना फोन आला की, रंजित चा मुत्यु झाला आहे. तुम्ही घ्यायला येता की आम्ही आणुन देऊ, तेव्हा आणुन द्या म्हटल्या ने एका वाहनाने रंजितचा मुत्युदेह केरडी बस स्टापवर आणुन वाहन चालकाने घरच्याना रोडवर घेण्यास या म्हटले, तेव्हा म्हटले की तुम्ही घरीच आणुन द्या म्हट ल्याने रंजित ढगे चा मुत्युदेह घरी दुपारी ४ वाजता आणल्यावर घरच्या मंडळीने उघडुन बघितले तर त्याच्या नाका, तोंडातुन रक्त निघल्याचे तसेच शरीरावर मारल्याचे दिसल्याने घातपाता च्या संशयाने वाहन चालकास विचारले तर त्यानी व्यसन मुक्ती केंद्राच्या अधिका-यांना विचारण्यास सांगितल्याने ग्रामस्थ संत प्त होऊन काही वेळ वातावरण तापल्याने नातेवाईक व ग्रामस्थानी त्याच वाहनात मुत्युदेह ठेऊन कामठी उपजिल्हा ग्रामिण रूग्णालयात नेले असता ही घटना जिथे घडली तेथे पोलीसाना माहीती देऊन शवविच्छे दन करावे. असे सांगण्यात आल्याने वाटोडा पोलीस स्टेशन गाठुन तक्रार दाखल केल्याने पोलीसानी वैद्य कीय महाविद्यालय व रूग्णालय नागपुर येथे रात्री शवविच्छेदना करिता मुतदेह ठेवण्यात आला.
गुरूवार (दि.५) मे ला नागपुर येथुन रंजित ढगे चा मुत्युदेह शवविच्छेदन करून दुपारी ३.३० वाजता केरडी घरी आणुन सायंकाळी ५.३० वाजता स्मश्यान घाट केरडी येथे अंतिम संस्कार करण्यात आला असुन गावात युवकाच्या मुत्यु ने शोककळा पसरली आहे.