श्रीरामनवमी व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती शांततेत पार पाडा-डीसीपी मनीष कलवानिया

संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 9 :- उद्या 10 एप्रिल ला रामनवमी तसेच 14 एप्रिल ला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे.तेव्हा हे दोन्ही उत्सवाला कुठलेही गालबोट लागणार नाही याची दक्षता घेत हे दोन्ही उत्सव शांततेत पार पाडा असे आव्हान डीसीपी मनीष कलवानिया यांनी नवीन कामठी पोलीस स्टेशन सभागृहात आयोजित बैठकीत व्यक्त केले.
या बैठकीला श्री राम नवमी शोभायात्रा समिती तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम समिती च्या पदाधिकारी सह प्रतिष्ठित नागरिकांना ही बोलविण्यात आले होते.यावेळी दोन्ही समित्यांची बैठक घेवून दोघांनाही कार्यक्रमाच्या सूचना देण्यात आल्या.यात डीजे वाजवताना शासनाने ठरवून दिलेल्या निर्देशानुसार आवाज ठेवण्यात यावा.
दोन्ही कार्यक्रम शांततेत व कुठलेही गालबोट न लागता पार पाडावे, शिवाय कार्यक्रमा दरम्यान काही लोक नशापाणी करून कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतात त्यांना वेळीच सावध करून पोलिसांच्या स्वाधीन करावे.दोन्ही उत्सव आपलेच आहेत याचे भान ठेवून कार्यक्रम शांततेत पार पाडावे असे आव्हान केले.
ही बैठक डीसीपी मनीष कलवानिया व एसीपी यांच्या मूख्य उपस्थितीत घेण्यात आली होती.बैठकीला श्री राम नवमी शोभायात्रा समिती तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम समिती चे मुख्य पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कामठी नगर परिषदची विक्रमी वसुली

Sat Apr 9 , 2022
संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 9:- कामठी नगर परिषद स्थानिक स्वराज्य संस्थाचा एक भाग असून नागरीकाकडून मिळत असलेल्या विविध करातून नगर परिषद चा कारभार सुरू असतो .तेव्हा हा कारभार सुरळीत रहावा व नागरिकांनी योग्य वेळी कराचा भरणा करून एक जवाबदार नागरिक असल्याचे साध्य करावे असे समुपदेशन कामठी नगर परिषद च्या संबंधीत कर्मचाऱ्याने केल्याने कामठी शहरातील बहुतांश नागरिकांनी कराचा भरणा […]
kamptee

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com