हर हर महादेव च्या जयघोषाने दुमदुमले श्रीक्षेत्र कामठेश्वर शिव मंदिर

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कोलार , कन्हान आणि पेंच या तीन नदीच्या त्रिवेणी संगमावर 336 वर्षापूर्वीचे वसलेले जुनी कामठी चे श्रीक्षेत्र कामठेश्वर शिव मंदिर आज 17 फेब्रुवारीलाला महाशिवरात्रीच्या पर्वनिमित्त श्रद्धाळू भक्तभाविकांच्या हर हर महादेवाच्या जयघोषाने चांगलेच दुमदुमले.

महाशिवरात्री पर्वानिमित्त जुनी कामठी स्थित मानवता चे प्रतीक व अति प्राचीन कामनापूर्णश्रीक्षेत्र कामठेशवर शिव मंदिरात कामठी शहर तसेच ग्रामीण भागातील नागरिकांसह इतर ठिकानातील भाविकांनी एकच गर्दी केली होती पहाटे 4 वाजता भगवान श्री कामठेशवर महादेव यांचा अभिषेक करून पूजा अर्चना करण्यात आली.

मंदिरात दर्शनार्थ येणाऱ्या भाविकांसाठी विविध मार्गावर विविध सामाजिक, धार्मिक संघटना तसेच मंदिर कमिटच्या वतीने ठिकठिकाणी भव्य महाप्रसाद तसेच शरबत वितरण करण्यात आले होते. भाविकांच्या सुरक्षात्मक दृष्टिकोनातून पोलीसांचा चोख बंदोबस्त लावलेला असून दुर्घटनेला आळा बसावा यासाठी नदीकाठी तसेच मंदिर परिसरात विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले होते. तसेच आजच्या दिवशी भाविकांना सोयीचे व्हावे यासाठी कन्हान ते कामठी येथील गंज के बालाजी मंदिर होत आशा हॉस्पिटल समोरून वारेगाव बाह्य वळण मार्गे जुनी कामठी कामठेश्वर मंदिर पर्यंत स्टार बसची सोय करण्यात आली होती.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com