नागपूर :- आंबेडकरी विचार मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायणराव बागडे यांनी आज 28 व्या शहीद वर्धापन दिनानिमित्त शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली असून आपले मत व्यक्त करित गोवारी समाजाच्या संघर्षाला आज २८ वर्ष झाले अजुन पंर्यत न्याय मिळाला नाही. 1994 साली चेंगराचेंगरीत 114 आदिवासी बांधव शहिद झालेत. अजुन किती शहिद होणार यांची सरकार वाट पाहणार का? आता दलित गोवारी ऐक्य झाले तर संघर्षांची धार अधिक मजबूत होईल असे प्रतिपादन आंविमो आणि आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी केले.ते आज स्मारक परिसरात शहिद गोवारी बांधवांना गोवारी स्मारक येथे अभिवादन करताना बोलत होते. कार्यक्रमात ओबीसी नेते आनंद गोरे, राजुदादा पांजरे, विदर्भ प्रदेश सचिव प्रवीण आवळे, नागपूर शहर अध्यक्ष प्रा.रमेश दुपारे, मामासाहेब मेश्राम, तन्हा नागपूरी, शालिक बांगर, प्रदिप धुपे, नामदेवराव निकोसे आणि यावेळी गोवारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दलित गोवारी ऐक्य संघर्षाचे प्रतिक ठरणार – नारायण बागडे
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com