मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेनची सद्यस्थिती

– आतापर्यंत 290.64 किलोमीटरचा पायर पाया,267.48 किलोमीटरचे पायर बांधकाम, 150.97 किलोमीटरचे गर्डर कास्टिंग आणि 119 किलोमीटरच्या टप्प्यावर गर्डर टाकण्याचे काम पूर्ण

नवी दिल्‍ली :- मुंबई-अहमदाबाद जलदगती रेल्वे (एमएएचएसआर) प्रकल्पासाठी 1,08,000 कोटीरुपये मंजूर करण्यात आले आहेत. या प्रकल्पात आतापर्यंत 290.64 किलोमीटरचा पायर पाया,267.48 किलोमीटरचे पायर बांधकाम, 150.97 किलोमीटरचे गर्डर कास्टिंग आणि 119 किलोमीटरच्या टप्प्यावर गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. सर्व प्रकारची कंत्राटे देऊन झाल्यानंतर या प्रकल्पाला लागणारा अंदाजित कालावधी आणि एकंदर खर्च निश्चितपणे सांगता येईल.

उच्च विकासदर असणाऱ्या महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमध्ये हा एमएएचएसआर प्रकल्प विस्तारणार असून त्यामुळे मुंबई,सुरत,बडोदा आणि अहमदाबाद ही महत्त्वाची व्यापारी केंद्रे जोडली जाणार आहेत. जपानच्या आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्थेतर्फे (जेआयसीए) करण्यात आलेल्या व्यवहार्यताविषयक अभ्यासातून असे दिसून आले आहे की या प्रकल्पाचा आर्थिक अंतर्गत परतावा दर (ईआयआरआर) 11.8% असण्याची शक्यता आहे.

केंद्रीय रेल्वे, दळणवळण तसेच इलेक्ट्रॉनिक्सआणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

BASKETBALL CHAMPS OF CPS WN

Sat Feb 10 , 2024
Nagpur :- In the recently concluded Inter School Basketball Tournament organized by DPS Lava, Centre Point School Wardhaman Nagar’s boys’ team performed exceptionally well, securing the runner-up position. The team, consisting of talented players like Parth Khandelwal, Darsh Rathi, Shourya Shaw, Arnav Kedia, Jeet Patel, Hriday Sharma, Krishay Kothari, Sadhil Sangar, Brijesh Punyani, Granth Gupta, Meet Sinha, and Darsh Kothari, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com