नागपुर – गुन्हे शाखा, नागपूर शहर येथील युनिट क्र.02 पथकाची कामागीरी आरोपी 1) निशिद महादेव वासनिक व 2) प्रगती निशिद वासनिक, रा. वसीम प्राईड, सोसायटी आराधना नगर,खरबी नागपुर 3) गजानन भोलेनाथ मुनगुने. रा. भिसी, तहसिल चिमुर, जिल्हा – चंद्रपुर, ह.मु. राजे रघुजी नगर, नागपुर 4) संदेश पंजाब लांजेवार, रा. गोंडेगांव खदान कन्हान, नागपूर यांनी संगणमताने सर्वसाधारण नागरिकांना इथेरॉन (डिजिटल करेंसी) मध्ये गुतंवणुक करुन अत्याधिक जास्त प्रमाणावर फायदा करुन देण्याचे आमिष दाखवुन इथर ट्रेंड एशिया नावाने ऑनलाईन प्लेटफार्म तयार केले होते. ईथर ट्रेंड एशिया या ऑनलाईन प्लेटफार्मच्या माध्यमाने आरोपीतांनी सर्वसाधारण नागरिकांना वेग वेगळ्या स्किम मध्ये गुंतवणुक करण्याचे प्रलोभन देऊन गुंतवणुकदरांनी गुंतवणुक केलेल्या रक्कमेचा गैरवापर स्वतःचे आर्थिक फायद्या करिता केला. अश्या फिर्यादी यांनी दिलेल्या रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन यशोधरानगर, नागपुर शहर येथे कलम 120(ब) 406, 409, 420 भा.द.वि सहकलम 3,4 एम.पी.आय.डी एक्ट. सहकलम 66(ड) माहिती व तंत्रज्ञान अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. सदर गुन्हयाचे तपासादरम्यान यातिल आरोपीतांनी 172 लोकांकडुन जवळ जवळ 03 कोटी 70 लाख रुपये जमा करुन त्यांची फसवणुक केल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदर गुन्हा दाखल झाल्यापासुन यातील मुख्य आरोपी निशिद महादेव वासनिक व त्याचे उपरोक्त नमुद साथिदार पसार झाले होते व सदर गुन्हयात आरोपीत फरार असतांना गुन्हयातील मुख्य आरोपी निशिद वासनिक तसेच आरोपी संदेश लांजेवार, गजानन मुनगुने यांनी ईथर/क्रिप्टो करेंसी संदर्भाने पैशेयांची देवाण घेवाण या कारणाने त्यांचे सहकारी मृतक नामे माधव पवार रा. नागपूर यास त्याचे नागपूर येथिल राहात्याघरातुन त्याचा अपहरण करुन ग्राम पांघरीकुटे पो.स्टे मालेगांव जिल्हा वाशिम येथे शेतशिवारात निर्जन स्थळी नेऊन अग्निशस्त्राचा (देसी बनावटीची पिस्टल) ने कपाडावर व छातीवर बंदुकीच्या गोळ्या मारुन ठार केल्याची घटना केली आहे व त्याअनुशंगाने पोलीस स्टेशन मालेगांव जिल्हा वाशिम अप क्रमांक 395/2021 कलम 302, 201, 34 सहकलम 3, 25 भारतिय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद असुन सदर गुन्हयात देखिल वरिल नमुद आरोपीत फरार होते.
नागपूर शहर येथे दाखल गुन्हयात आरोपीत फरार असल्याने सदर आरोपीतांचे शोधार्थ मदत करणार्यांना 50 हजार रुपये बक्षिस जाहिर करण्यात आले होते.
सदर आरोपी इसमांचे विरुध्द फसवणुक तसेच खुन करणे या सारखे गंभिर गुन्हे दाखल असुन आरोपी नागपुर शहर सोडुन पुणे येथिल रिट्रट व्हॅली पांगोळी, लोणावळा पुणे येथिल एक बंगलो किरायाने घेऊन त्याठिकाणी परिवारासह राहाव्यास होते.
सदर गुन्हयातील आरोपीत पुणे येथे असल्याची माहिती गोपनिय माहिती गुन्हे प्रकटीकरण पथकास प्राप्त झाली होती सदर माहितीच्या आधारे मा. पोलीस आयुक्त, नागपुर शहर यांनी गुन्हे प्रकटीकरण पथक क्रमांक 02, मध्ये कार्यरत अधिकारी व अमंलदार यांना पुणे येथे आरोपीतांचे शोधार्थ रवाना होऊन आरोपीतांचा शोध घेणे संदर्भाने आदेशीत केल्याप्रमाणे, गुन्हे प्रकटीकरण पथक क्रमांक 02, मध्ये कार्यरत अधिकारी व अमंलदार यांनी पुणे येथे प्राप्त माहितीच्या ठिकाणी रेकी करुन अत्यंत शिताफिने आरोपीतांना ताब्यात घेतले व आरोपीतांचे ताब्यातुन एकुण रु. 1,13,91,210/- चा मुद्देमाल ताब्यात घेतलेला आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्तअमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त अश्वती र्दोजे, अपर पोलीस आयुक्त सुनिल फुलारी यांचे निर्देशान्वये पोलीस उप आयुक्त(आर्थिक गुन्हे) अक्षय शिंदे , सपोआ रोशन पंडीत यांचे मार्गसदर्शनाखाली पो.नि किशोर पर्वते सपोनि गणेश पवार, पोउपनि मोहेकर, पोउपनि तांबुसकर, पोउपनि बलराम झाडोकर, संतोष मदनकर, राजेष तिवारी, प्रशांत कोडापे, आशिष ठाकरे, सचिन आंधळे, योगेश गुप्ता, सुरज भोंगाळे, सुहास शिगणे, दिपक चौव्हाण, सुनिल कुंवर, रवी शाहु, शेषराव राऊत, रोनॉल्ड एंथोनी, श्याम कडु, रामनरेश यादव, महेंद्र सडमाके, किशोर ठाकरे, हेमा बच्छे, चापोशि प्रविण रणदिवे, चापोशि मंगल जाधव, चापोशि प्रविण चव्हाण केली असुन सदर कार्यवाही दरम्यान लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे वपोनि डुबल, पो.हवा संदीप घोटकर, पोना/सरोदे, पोशि /विकास कदम, पोशि कुंवर, मपोना शेडगे, तसेच पुणे ग्रामिण येथिल स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शेळके सपोनि काळे व त्यांचे स्टाफ यांनी मोलाचे सहकार्य केले.