कामठी तालुक्यातील ग्रामीण भागात अंधाराचे संकट

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी तालुक्यातील ग्रामीण भागात चोरीचे प्रमाण वाढले असून चोरट्यानी आता विद्दूत डी पी च्या ऑईल चोरीकडे आपला मोर्चा वळविला आहे ज्यामुळे ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू असून बहुधा गावात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.एकदा गेलेला वीज पुरवठा आठ आठ दिवस सुरळीत होत नाही त्यामुळे ग्रामवासीयांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

ऑइल चोरीमुळे गावात विज पुरवठा होत नसल्याने नागरिकांना अंधारातच दिवस काढावे लागत आहेत त्यातच शेतीचे कामे सुरू असून वीज पुरवठ्या अभावी शेतीकामे रखडलेली आहेत.रात्री अंधारात झोपले असता सरपटणाऱ्या प्राण्यांचा सुद्धा धोका निर्माण झाला आहे तेव्हा विद्दूत विभागाने यावर तात्काळ उपाययोजना शोधून वीज पुरवठा सुरळीत करावे अशी मागणी केम ग्रा प चे सरपंच अतुल बाळबुधे यांनी केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दरडप्रवण क्षेत्रात संरक्षक भिंत बांधण्याबाबतचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत - मंत्री अनिल पाटील 

Mon Jul 24 , 2023
मुंबई :- दरडप्रवण भागाच्या अनुषंगाने आज मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्याची आढावा बैठक मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी मंत्रालयात घेतली. दरडप्रवण क्षेत्रात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत संरक्षक भिंत बांधण्याबाबतचे परिपूर्ण प्रस्ताव 10 दिवसांत सादर करावेत, असे निर्देश मंत्री पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले. मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्यातील खासगी जमिनीवर स्लम ॲक्टखाली घोषित केलेल्या झोपडपट्ट्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com