स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करा

नागपूर :- लवकरात लवकर स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करावी, अन्यथा येत्या १५ ऑगस्टपासून चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील मस्की दाम्पत्य लोखंडी पिंजऱ्यात आमरण उपोषण करणार असल्याची माहिती जय विदर्भ पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण केदार यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

आज विकासाच्या दृष्टीने विदर्भ महाराष्ट्रच्या १०० पट मागासला आहे. यास सर्वस्वी आमचे आजी माजी आमदार-खासदार, मंत्री काँग्रेस व भाजपचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री हे जबाबदार आहेत. जर का विदर्भाच्या जनतेची, युवकांची, शेतीची शेतकऱ्यांची उन्नती करायची असेल तर आता विदर्भ राज्य निर्माण करणे आहे. त्यासाठी आम्ही जय विदर्भ पार्टीच्या नेतृत्वात व विदर्भप्रेमी शोभा मस्की व बाबा मस्की रविवार, ११ ऑगस्ट २०२४ पासून लोखंडी पिंजऱ्यात स्वतःला कोंडून महाराष्ट्र अन्याय करीत आहे, असे प्रतिकात्मक निषेध आंदोलन करणार असल्याचेही केदार यांनी सांगितले. १५ ऑगस्ट २०२४ पासून शोभा मस्की ह्या लोखंडी पिंजऱ्यात स्वतःला कोंडून संविधान चौक, नागपूर येथे अन्यत्याग आंदोलन करणार आहेत.

या आंदोलनाला संपूर्ण विदर्भवादी जनता, युवक, जय विदर्भपार्टी, भारतराष्ट्र समिती, विदर्भ राज्य आंदोलन समिती, नाग विदर्भ आंदोलन समिती, विदर्भवीर भाऊ जांबुवंतराव धोटे विचारमंच, फॉरवर्ड ब्लॉक पार्टी, विदर्भ राज्य आघाडी व नागपूरची जनता व विदर्भातील ३ कोटी जनता या सर्वांनी मस्की दाम्पत्यांच्या आंदोलनाला तन-मन- – जनदेऊन सहकार्य करावे, असे आवाहनही केदार यांनी याप्रसंगी केले.

मस्की दाम्पत्य करणार आमरण उपोषण आम्ही घरी जाणार नाही

आम्ही दोघेही १० ऑगस्ट २०२४ पासून प्रतिज्ञा घेणार आहोत की, ‘जोपर्यंत विदर्भ राज्य निर्माण होणार नाही तोपर्यंत आपल्या घरी जाणार नाहीत व लोखंडी पिंजऱ्यातच वास्तव्य करून विदर्भभर जनजागृती करणार असल्याचे बाबा मस्की व शोभा मस्की यांनी यावेळी सांगितले. १० ऑगस्टला दुपारी १२ वाजता यशवंत स्टेडियम ते विधानभवनापर्यंत लाँगमार्च काढण्यातयेणार आहे. यानंतर विधानभवनावर स्वतंत्र विदर्भराज्याचा झेंडा फडकवणार असल्याचे बाबा मस्की यांनी सांगितले

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आमदार देवेंद्र भुयार यांनी घेतला मोर्शी विधानसभा मतदार संघातील विकास कामांचा आढावा ! 

Wed Jul 31 , 2024
– मतदार संघातील समस्यांचा निपटारा करण्याचे दिले निर्देश !  मोर्शी :- मोर्शी विधानसभा मतदार संघातील खालील विविध समस्यांचा निपटारा करण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी व जिल्ह्यातील संपूर्ण विभागांच्या खतेप्रमुखंची महत्वाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे संपन्न झाली. आमदार देवेंद्र भुयार यांनी मतदार संघातील समस्या तत्काळ निकाली निघाव्या व मतदार संघातील काही विषय तात्काळ सोडविण्यासारख्या असतात परंतू सदर विषय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com