सेवानिवृत्त शिक्षक गजभिये यांचा सपत्नीक सत्कार..

अमरदिप बडगे, प्रतिनिधी

आदिवासी विद्यार्थ्यांना अध्यापन करने म्हणजे पुण्यकर्म… प्राचार्य कमल कापसे

गोंदिया:- जिल्ह्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा पुराडा येथील इंग्रजी शिक्षक डी .आर.गजभीये हे नियतकालीन वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले त्यांच्या सेवानिवृत्त सत्कार प्रसंगी शाळेचे प्राचार्य कमल कापसे यांनी सांगितले की आदिवासी विद्यार्थ्यांना अध्यापन करने म्हणजे अत्यंत पुण्यकर्म आहे .

शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा पुराडा येथे कार्यरत इंग्रजी शिक्षक डि.आर.गजभीये हे 31 ऑगस्ट ला सेवानिवृत्त झाले त्यांचा सपत्नीक सत्कार शाल, श्रीफळ, सर्ट प्यांट साडी व भेटवस्तू स्वरूपात घड्याळ देऊन नुकताच प्राचार्य कमल कापसे यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी प्रास्ताविकात बोलताना प्रा.संदीप बिसेन यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला त्याचप्रमाणे मराठी शिक्षक अरविंद बागडे यांनी गीतगायन करीत वातावरण मंत्रमुग्ध केले.

सेवानिवृत्त शिक्षक गजभिये यांनी आपल्या जिवनाची यशोगाथा सांगत अथक परिश्रम केल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नसते याचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे असे सांगून शाळेतील सर्व शिक्षकांचे आभार मानले आणि प्राचार्य कमल कापसे यांच्या खाली काम करताना कसे दिवस गेले कळलेच नाही असे सांगून भावविवश झाले, कार्यक्रमाचे आयोजन प्रा.बलवंत सोमवंशी,प्रा.माया बोपचे,प्रा.वैयजंती नेनावत,प्रा.रवि गणवीर,प्रा.देवा मेश्राम, महेंद्र राऊत,सुजाता मेश्राम, भोजराज लंजे, मोरेश्वर धवने,वृशाली येरने, कोरे,वर्षा सांगोळे,दुर्गा लांजेवार,प्रिती खंडाते, अशोक फुंडे यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय टेंभरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.राजेश हट्टेवार यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

MMS कांड में नई परेशानी, छात्राओं को विदेश से आए धमकी भरे कॉल.

Mon Sep 19 , 2022
मोहाली – पंजाब के मोहाली में छात्राओं के कथित अश्लील वीडियो फिल्माने का मामला गर्माया हुआ है। मामला चंडीगढ़ यूनिवर्सिटी का है। फिलहाल, पुलिस ने भी कर्रवाई तेज कर दी है और तीन लोगों को अब तक गिरफ्तार किया जा चुका है। बीते दिन यूनिवर्सिटी में छात्रों ने जमकर विरोध प्रदर्शन भी किया। मोहाली के चंडीगढ़ विश्वविद्यालय में अश्लील वीडियो […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com