नागपूर, ता. २० : नागपूर महानगरपालिके तर्फे गुरुवारी (२० जानेवारी) रोजी ७ प्रतिष्ठान विरुद्ध कारवाई करून ९० हजाराचा दंड वसूल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने गांधीबाग झोन अंतर्गत बडकस चौक येथील कॅरिअर अकॅडमी यांच्या विरुद्ध कोविड नियमांच्या उल्लंघन करण्याबद्दल कारवाई करून रु २५,००० च्या दंड वसूल केला. तसेच मंगलवारी झोन अंतर्गत दीपक सर अकॅडमी, फारस चौक, झिंगाबाई टाकळी येथे कारवाई करुन २५ हजार रुपयाचा दंड वसूल केला.
प्रतिबंधित प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या दुकान, प्रतिष्ठानांविरोधात मनपाने कारवाई अधिक कठोर केली आहे. महाराष्ट्र शासनाद्वारे बंदी आणल्यानंतरही प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास येताच मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथकाने कारवाईला गती दिली आहे. मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार बाजारपेठ, दुकान, भाजी बाजारात प्लास्टिक पिशवीमध्ये सामान देणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्यात येईल व दंडही वसूल करण्यात येणार आहे.
गुरुवारी (ता.२०) धंतोली झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात कारवाई करण्यात आली. पथकाने धंतोली कॉटन मार्केट येथील बंडु पत्तल यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनात उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली.