संदीप कांबळे, कामठी
कामठी ता, प्र 28 – सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालय कामठी येथे दिनांक 21 /3/22 पासून ते 26/3/22 पर्यंत महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, सलाद स्पर्धा,हस्त लेखन स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, बेस्ट फ्रॉम वेस्ट स्पर्धा, विविध क्रीडेशी संबंधित खेळ स्पर्धा असा भरगच्च कार्यक्रम मागील सात दिवसापासून चालू होता या कार्यक्रमामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यांना पुरस्कार देण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे आयोजन खऱ्या अर्थाने करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.बी. बागडे हे होते. तर प्रमुख पाहुणे श्री.अशोकजी भाटीया हे होते. सांस्कृतिक कार्यक्रमाचे संयोजक डॉ. इफ्तेखार हुसेन हे सुद्धा विचारपीठावर उपस्थित होते. पुरस्कार वितरण सोहळ्याच्या संयोजिका डॉ.रेणू तिवारी ह्या सुद्धा विचारपीठावर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. समृद्धी टापरे यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. स्वप्नील डाहाट यांनी केले तर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ. विनय चव्हाण, डॉ. बांबल, डॉ. इंद्रजीत बासू, डॉ. आशा रामटेके, डॉ. असरार,डॉ.प्रशांत धोंगडे डॉ. नितीन मेश्राम डॉ. मनीष चक्रवर्ती डॉ. आलोक राय डॉ. रतीराम चौधरी इत्यादी प्राध्यापकांनी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता.