कोविड नियमांचे उल्लंघन : शोध पथकाची कारवाई

नागपूरता. २४ :  नागपूर महानगरपालिके तर्फे  गुरूवारी (२४ फेब्रुवारी) रोजी ०४ प्रतिष्ठान विरुद्ध कारवाई करून २० हजाराचा दंड वसूल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाव्दारे हनुमाननगर झोन अंतर्गत मेडीकल चौक येथील हल्दीराम, ताज बिर्यानी आणि संगम हॉटेल यांच्या विरूध्द रस्त्यालगत अतिक्रमण केल्याबद्दल कारवाई करून १५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. त्याचप्रमाणे लकडगंज झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात कारवाई करण्यात आली. पथकाने लकडगंज, पारडी येथील माँ दुर्गा क्लॉथ स्टोअर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनात उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

अज्ञात वाहनाच्या धडकेने हरणाचा मृत्यु

Fri Feb 25 , 2022
– संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 25:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आजनी-गादा मार्गावर रस्ता ओलांडत असलेल्या हरिणाला एका वाहनाने दिलेल्या धडकेतून जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 7 दरम्यान विनोद वाठ यांच्या शेताजवळ उघडकीस आली असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांच्या मदतीने सदर हरणाचा मृतदेह वनविभागाकडे सुपूर्द करण्यात आले. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com