मनपाची लसीकरण लकी ड्रॉची सोडत जाहीर;  भाग्यश्री गजभिये यांना प्रथम बक्षीस

चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे आयोजित लसीकरण लकी ड्रॉची सोडत महापौर राखी कंचर्लावार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात बालकांच्या हस्ते कुपन काढून विजेत्यांची घोषणा करण्यात आली.


महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरणाचा टक्केवारी वाढावी व नागरिकांना लसीकरणास प्रोत्साहन मिळावे, यासाठी महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या संकल्पनेतून लसीकरण बंपर लकी ड्रॉची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार दि. १२ नोव्हेंबर ते २० डिसेंबर २०२१ दरम्यान कुपन जमा करण्यात आले. या योजनेस मोठा प्रतिसाद मिळाला. शुक्रवार, ता. २४ डिसेंबर रोजी महापौर राखी कंचर्लावार यांच्या अध्यक्षतेखाली राणी हिराई सभागृहात सोडत काढण्यात आली. यावेळी स्थायी समिती सभापती संदीप आवारी, अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार यांची उपस्थिती होती. सर्व भाग्यवान विजेत्यांना एका सोहळयात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
यात प्रथम बक्षीस  भाग्यश्री गजभिये यांना फ्रिज, दुसरे बक्षीस विनोद लाडे यांना वॉशिंग मशीन, तिसरे बक्षीस रामप्रसाद बिस्वास यांना एलईडी टीव्ही जाहीर करण्यात आली. याशिवाय १० मिक्सर ग्राइंडर प्रोत्साहनपर बक्षिस विजेत्यांत रणजित कुळसंगे, सुनीता शेंडे, उमा मोहुर्ले, तिरुपती झाडे, अरविंद मानकर, कल्पना तारगे, ताराबाबू सिडाम, राम मोघे, हरीश्चन्द्र दोगडे, चेदीलाल गुप्ता यांचा समावेश आहे. दरम्यान, लसीकरण लकी ड्रॉची सोडत कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण महानगरपालिकेच्या cmcchandrapur फेसबुक पेजवरून करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

Tecno CAMON 18 brings 48MP selfie and 48MP rear camera with virtual RAM expansion up to 7GB at just INR 14999

Sat Dec 25 , 2021
  -Priced at INR 14,999, CAMON 18 sports a segment first 48 MP Ultra Clear Selfie camera with 48MP AI Triple rear camera powered by TAIVOSTM -Consumers can avail free complimentary Buds 2 worth INR 1999 with every purchase of CAMON 18 -TECNO CAMON 18 will be available across brand’s 50K+ retail touchpoints PAN India starting 27th Dec New Delhi,  […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com