संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– माजी उपाध्यक्ष काशीनाथ प्रधान यांनी दिले मुख्याधिकारीला सामूहिक निवेदन
कामठी :- कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या प्रभाग क्र 10 अंतर्गत येणाऱ्या श्री टॉकीज चौक,निंबाजी अखाडा रोड, सत्तू हलवाई चौक तसेच कोळसा टाल सह आदी परिसरात गेल्या चार-पाच दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दूषित पाण्यामुळे पोटाचे विकार जडत असल्याने अनेकांना डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागत आहे.यासंदर्भात कामठी नगर परिषद पाणी पुरवठा अभियंता अवी चौधरी यांना मौखिक तसेच भ्रमण ध्वनी द्वारे व्हाट्सएप वरून माहिती दिली मात्र अवी चौधरी यांनी माजी उपाध्यक्ष काशिनाथ प्रधान यांच्या माहिती ला केराची टोपली दाखवली यावरून पाणीपुरवठा विभाग याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत माजी उपाध्यक्ष काशिनाथ प्रधान यांनी सदर विषय गांभीर्याने लक्षात घेत दूषित पाणी पुरवठ्याची समस्या त्वरित दूर करावी यासंदर्भात नगर परिषद चे प्रशासक संदीप बोरकर यांच्याकडे निवेदन सादर केले.