पुणे :-देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून सत्ताधाऱ्यांसर विरोधकही निवडणूक प्रचाराला लागले आहेत. यादरम्यान केंद्र सरकराने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणाऱ्या मजुरांच्या संदर्भात मोठी घोषणा केली आहे. मनरेगा अंतर्गत मजुरांच्या मजुरीत ३ ते १० टक्के वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यामुळे मनरेगा मजूरांना पूर्वीपेक्षा जास्त मजुरी मिळणार आहेत. गुरुवारी (ता. २८) सरकारने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. मात्र, ही वाढ १ एप्रिलपासून लागू होणार आहे.
या नव्या घोषणेमुळे महाराष्ट्रातील मजुरांच्या मजुरीत २४ रूपयांहून अधिकची वाढ होणार आहे. तर गोव्यातील मजुरांच्या मजुरीत सर्वाधिक ३४ रुपयांची वाढ झाली आहे. मनरेगा अंतर्गत मजुरीतील ही वाढ प्रचलित दराच्या (NREGS) १०.५६ टक्के आहे. तर सर्वाधिक कमी वाढ उत्तराखंडमधील मजुरीत झाली आहे.
कोणत्या राज्यात किती मजुरी?
मनरेगाच्या मजुरीत वाढ करण्याची घोषणा सरकारने केली आहे. यानंतर सर्वाधिक वाढ ही गोव्यात झाली असून येथे मजुरीत ३४ रूपये वाढ करण्यात आली आहे. गोव्यात या आधी ३२२ रुपये प्रतिदिन मजुरी मिळत होती. ती आता वाढून ३५६ रुपये झाली आहे. तर तर सर्वात कमी मजुरी उत्तराखंडमध्ये दिली जाणार असून येथे ३.०४ टक्के वाढ झाली आहे. येथे फक्त ७ रूपये वाढ झाली आहे. येथे आधी २३० रुपये मजुरी दिली जात असे ती आता २३७ रुपये प्रतिदिन असेल. म्हणजेच गोवा आणि उत्तराखंडमधील मजुरीत ११९ रूपयांचा फरक आहे.
महाराष्ट्रात २४ रूपये वाढ
याआधीही मनरेगा मजुरांच्या मजुरीत २६ रूपयांनी वाढविण्यात आली होती. यानंतर आता २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्रात २४ रूपयांची वाढ करण्यात आली असून आता कामगारांना प्रति दिवशी २९७ रूपये मजुरी मिळणार आहे. तर याच्याआधी २७३ रूपये मजुरी मिळत होती.