नागपूर :- फिर्यादी उज्वल रमेश गेडाम वय ४० वर्ष रा. गोकुलपेट, बौद्ध विहारा जवळ, अंबाझरी नागपूर यांचे घराचे बांधकाम पो. ठाणे अंबाझरी हद्दीत प्लॉट न. २६६, धरमपेठ, शिवाजी नगर, नागपुर येथे सुरू असून त्यांनी घराचे बांधकामा करीता लोखडी सडाखी आणल्या होत्या. आरोपी १) शंकर देवाजी चौधरी वय ३२ वर्ष २) गजानन राजु शनेश्वर वय २४ वर्ष दोन्ही रा. पांढराबोडी, अंबाझरी, नागपूर यांनी दि. १३.०५. २०२३ चे २०.३० वा. चे सुमारास फिर्यादीने उघड्या भागात ठेवलेल्या साहित्या पैकी आठ व दहा एमएमच्या लोखंडी सडाखी किमती एकूण ५,०००/- रु या मुद्देमाल बांधुन घेवुन जात असता दिसल्याने तेथील गार्ड याने आरडाओरड केली असता जमलेल्या लोकांनी पाठलाग करून आरोपींना बास्केट बॉल ग्राउंड जवळ, धरमपेठ येथे मुद्देमालासह पकडले. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पो. ठाणे अंबाझरी येथे पोउपनि मात्रे ९८५०९११६६६ यांनी आरोपी विरुध्द कलम ३७९, ३४ भादवि अन्वये गुन्हा नोंदवून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.