गडचिरोली :- गडचिरोली जिल्ह्यातील अतीदुर्गम भागात कार्यरत असलेल्या सर्व पोस्टे/उपपोस्ट / पोमके हद्दीतील शालेय विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगार, महिला-पुरुष यांना शासनाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या शिक्षणासह बौद्धीक कला-गुणांना वाव मिडाव त्यांच्या वैचारिक क्षमतेत वाढ होऊन त्यांच्या विचारात बळ याचे व नक्षल विचारधारेकडे आकर्षीत होवू नये. तसेच त्यांना जगात घडत असलेल्या विविध आंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय / प्रादेशिक / स्थानिक घडामोडी, शासकिय योजना इ. बाबत माहिती मिळावी व वाचनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची व स्पर्धापरिक्षा विषयीची ओढ निर्माण यादी तसेच त्यांच्या उज्वल भविष्याकडे वाटचाल हावी यासाठी गडचिरोली पोलीस दल पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या संकल्पनेतून “एक गाव, एक वाचनालय” हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत पोसके मालेवाडा परिसरातील नागरिक व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने लोकवर्गणी व श्रमदानातुन मालेवाडा येथे भगवान बिरसा मुंडा सार्वजनिक वाचनालयाची निर्मीती करण्यात आली. सदर वाचनालयाचे आज दिनांक १०/०७/२०१३ रोजी आमदार (आरमोरी विधानसभा क्षेत्र) कृष्णाजी गजभे यांचे हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला.
या उद्घाटन सोहळ्यास पोसके मालेवाडा हद्दीतील २५० ते ३०० च्या संख्येने नागरीक उपस्थित होते. सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांचे आगमन होताच पोसके पासून ते वाचनालयापर्यंत ग्रंथदिडीला सुरुवात करण्यात आली. तसेच गावातील प्रमुख मार्गावरून शाळेतील विद्यार्थी व परिसरातील नागरीकांसह ही ग्रंथदिडी वाचनालयापर्यंत काढण्यात आली. वाचनालयामध्ये ग्रंथालय, अभ्यासिका, स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करण्याकरीता विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेकरीता टेबल, चेअर व सुक ठेवण्याचे कपाट व इतर पायाभुत सुविधेसह २०० न अधिक पुस्तके वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
सदर कार्यक्रमात मान्यवरांनी आपले संबोधनातून विद्यार्थी व नागरिकांना शिक्षण व वाचनाविषयीचे महत्व पटवून दिले. उद्घाटन सोहळ्याच्या प्रास्ताविकेत प्रभारी अधिकारी नारायण राठोड यांनी वाचनालय स्थापन करण्यासागचे उद्देश सांगीतले तसेच वाचनालयाचे उद्घाटक आमदार गजबे यांनी वाचलानयाच्या उभारणीकरीता वेळोवेळी कोणत्याही स्वरूपाची मदत लागल्यास मदत करण्याचे व भविष्यात आमदार निधीतूनबाचनालयाच्या उद्धारासाठी मदत करणार असे सांगीतले, तसेच अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता यांनी मार्गदर्शनपर भाषणात उपस्थित नागरीक व विद्यार्थ्यांनी गडचिरोली पोलीस दलामार्फत विदेश शिक्षणासाठी युवक-युवती यांच्या अंगी असलेल्या क्रिडा विषयक कलागुणांना वाव देण्यासाठी असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली व विद्याथ्र्यांनी आपली वाचन संस्कृती जोपासून भविष्यात स्पर्धा परिक्षेची तयार करुन या वाचनालयातून चांगले अधिकारी पयंत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच मालेवाडा येथील संपूर्ण नागरिकांचे हार्दीक अभिनंदन करून भविष्यात पोलीस प्रशासन आपल्या प्रत्येक कार्यात नेहमीच मदतीसाठी तत्पर असेन असे आश्वासन दिले. यासोबतच नरेशचंद्र काठोळे यांनी स्पर्धा परिक्षेचे महत्व पटवून सांगुन वाचनालयाकरीता स्पर्धा परीक्षेचे पुस्तके भेट दिली. तसेच शिंदे, विनर्स अॅकेडमी संभाजी नगर (औरंगाबाद) यांनी मालेवाडा वाचनालयात ई-लायब्ररी करीता सहकार्य करून मालवाडा हद्दीतील विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन मार्गदर्शन देणार असल्याचे मोबाईलद्वारे संपर्क करुन सांगीतले.
सदर उद्घाटन सोहळ्यास आमदार (आरमोरी विधानसभा क्षेत्र) कृष्णाजी गजबे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिता, नाकुशा, चे प्रभारी अधिकारी धनंजय पाटील, मिशन आयएस अमरावतीचे नरेशचंद्र काठोळे , माजी जि.प. सदस्य नंदू नरोटे, माजी जि.प. सदस्या गिता कुमरे , ग्रामपंचायत मालेवाडाच्या सरपंच अनुसया पेंदाम तसेच गोमकें मालेवाडा हद्दीतील सरपंच, पोलीस पाटील, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शासकिय कार्यालयाचे कर्मचारी च प्रतिष्ठित नागरीक तथा ग्रामस्थ उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी, कुरखेड साहील झरकर, पोमके मालेवाडाचे प्रभारी अधिकारी नारायण राठोड, पोउपनि भारत निकाळजे व सर्व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.