संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- युवा चेतना मंच तर्फे स्वामी विवेकानंद वाचनालय रनाळा येथे “संविधान दिवस ” साजरा करण्यात आले. याप्रसंगी युवा चेतना मंच चे कोषाध्यक्ष रूपेश चकोले यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम साजरा करण्यात आले. याप्रसंगी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधान यांना नमन करण्यात आले. याप्रसंगी सविधान उदेशीकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. रूपेश चकोले यांनी ” संविधानाचे महत्त्व ” या विषयावर मार्गदर्शन केले.तर अमोल नागपुरे यांनी ‘ ” संविधानाची गरज ” या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.पराग सपाटे तर आभार अक्षय खोपे यांनी केले याप्रसंगी नितीन ठाकरे , बाँबी महेंद्र ,अमोल मोहळ , नरेश सोरते प्रामुख्याने उपस्थित होते.